पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२)

तयोः स्थितिः " असे म्हणण्याइतकेंच आकुंचितपणाचे आहे. दक्षिणेतील मराठे हे स्वयंसिद्ध क्षत्रियच आहेत व त्यांच्या क्षत्रियत्वाबद्दल त्यांना रजपूताश नाते लावण्याचे कांहीच कारण नाही.

 प्रस्तुत ग्रंथांतील सर्व माहिती आघार व निर्विवाद अशीच दिली आहे. शिवाजीची जन्मतिथी जुनीच प्रमाण घरून नवीन तिथीचा उल्लेख मात्र केला आहे.

 राजकारणांत मराठे लोक उदयास येण्यास कोणकोणत्या पुरुषांची कर्तबगारी कारणीभूत झाली हे जाणणे आवश्यक आहे. लुकजी जाधवराव, मालोजी भोसले, मुरार जगदेव, उदाराम माहूरकर, साबाजी अनंत, चाजी घोरपडे वगैरे लोकांच्या उलाढाली, पराक्रम व मुत्सद्दीपणा यांमुळे इतर मराट्यांना पुढे येण्यास संधि मिळाली व तिचा फायदा शिवाजीस मिळाला. त्यावेळच्या विजापूर व नगर येथील मुसलमान सरदाराइतकेंच हिंदु सरदारहि होते व मुत्सद्दीगिरी तर बऱ्याच अंशी हिंदूच्या हाती भाळी होती. वरील राज्यांतील मुसलमानांचा जोम संपून नवीन दमाच्या मरा ठ्यांस बरेंच कार्यक्षेत्र मिळाले.

 प्रस्तुत ग्रंथांत निरनिराळ्या व्यक्तींच्या घराण्यांची माहिती दिली आहे ती मनोवेधक आहे. तसेच स्थळांची नक्की माहिती काळजीने दिली आहे. ग्रंथांतील निरनिराळी माहिती कोठून घेतली हे मात्र पुष्कळ ठिकाणी लिहिलेले नाही त्यामुळे चिकित्सकबुद्धीने वाचणारांस मूळ आघाराचा पत्ता लागण्यास अडचण पडेल. टीपेंत असे आघार देणें बरें. कारण दिलेल्या माहितीची जबाबदारी ग्रंथकर्त्यावर किती व आधारभूत ग्रंथांवर किती याची वाटणी बरोबर करितां येते.

 प्रस्तुत भागांत मुख्यत्वें शहाजी राजे भोसले यांचे चरित्र आले आहे. शहाजीच्या चरित्रांतील सर्व उपलब्ध माहिती ग्रंथकर्त्यांने दिली आहे. त्यावेळचे प्रसिद्ध व कर्ते पुरुष व त्यांच्या उलाढाली यांत वर्णिल्या आहेत. शेवर्टी शहाजीच्या चख्यिाचें मार्मिक विवेचन केले आहे. शिवाजीच्या कर्तृत्वाचें बीज शहाजीच्या कर्तबगारीत कसे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न