पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 कै० दत्तोपंत करकरे हे इतिहासाचे एकनिष्ठ सेवक होते. त्यांचे मरा- ठ्यांच्या इतिहासाचे पहिले तीन भाग प्रसिद्ध झाले आहेत. दुर्दैवानें रा. करकरे हे कालवश झाले. त्यांचे इतिहासाचा श चौथा भाग त्यांचे बंधू गो. बा. करकर यांनी प्रसिद्ध केला आहे.

 रा करकरे यांनी आपल्या ग्रंथाचा विस्तार फार मोठा घरला होता व त्या अंदाजाने पाहिले तीन भाग मराठ्यांचा वास्तविक इतिहास सुरू होण्यापूर्वीच्या पार्श्वभागांतच खर्ची पडले. हा पार्श्वभाग थोडक्यांत आव रला असता तर करकरे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाच्या श्रमाचें फल यापूर्वीच आपणांस मिळाले असते. पण मुख्य भाग सुरू होण्यापूर्वीच दुर्दैवानें करकरे मृत्युमुखी पडले.

 इलींच्या चौथ्या भागांत भोसले घराण्याची पूर्वपीठिका व त्यांचा उदेपूरच्या शिसोदे घराण्याशी संबंध या विषयींची परंपरागत आलेली सर्व माहिती दिली आहे. शहाजी व शिवाजी यांच्या वेळच्या व नंतरच्या सर्व बखरी व अलीकडे ग्रसिद्ध झालेले राघामाघव विलास चंपू, शिवभारत वगैरे ग्रंथ यांतील सर्व माहिती परिश्रमपूर्वक या भागाचे आरंभी दिली आहे. ही गाहिती दंतकथात्मक व पौराणिक स्वरूपाची असल्यामुळे त्यांतील प्रत्येक शब्द इतिहासाचे कसोटीस लागणार नाहीं. तरी भोसले व इतर मराठे हे खरे क्षत्रिय असून त्यावेळी ही समजूत सर्वमान्य होती व त्यांचे चरित्रहि क्षात्रवृत्तीचेच होते याबद्दल कोणासहि शंका राहिली नाही. उदेपूरच्या घराण्याशी दाखविलेले नाते हैं मात्र कितपत खरे असेल हे सांगतां येत नाहीं. हिंदुस्थानांत रजपूत हेच निर्विवाद व खरेखुरे क्षत्रिय आहेत अशी समजूत असल्यामुळे ज्याला म्हणून आपले क्षत्रियत्व सर्व- मान्य करावयाचे असेल त्यानें रजपुतार्शी संबंध दाखविलाच पाहिजे अशी बरेच दिवसांपासून परंपरा चालत आली आहे व याच कल्पनेत या बन्याच वंशावळींचे बीज आहे असा संशय येतो. वास्तविक रजपुतां- शिवाय दुसरे क्षत्रिय अस्तित्वात नाहीं हे म्हणणे म्हणजे " कालावाद्यं-