पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४८)

संबंध सक्तीच्या खुषीनेंच घडून आलेला असल्यामुळे शहाजीविषयी त्याचें मन शुद्ध नव्हते; आणि इट्टी निश्चयाला यश आल्यामुळेंच जांवई बनलेल्या शहाजीस तो नेहमींच पाण्यांत पहात असे; शहाजी अतिशय धोरणी व त्याचा दिवसेंदिवस होत चाललेला उत्कर्ष, आणि जाधवराव तितकाच अदूरदर्शी आणि त्याचें उत्तरोत्तर कमी होत चाललेले महत्त्व, यामुळे जाधव- रावाच्या मनांतील शहाजीविषयींच्या द्वेषांत भर पडलेली होती; आणि याच वेळी मोंगलांनी लाचाची लालूच दाखविल्यामुळे तो निजामशाही पक्ष सोडून मोंगलास जाऊन मिळाला होता. जाधवरावास मोंगलाकडून चोवीस हजार पायदळ व पंधरा हजार स्वारांची मनसबदारी मिळाली. ( इ० सन १६२१ ) आणि त्याच्या नातलगासहो बादशहाने मोठमोठ्या मनसबी दिल्या; तथापि जाधवरावाच्या ह्या वागणुकीमुळे निजामशाही दरबार त्याच्या पूर्णपणे विरुद्ध झाला; शहाजीस अतिशय राग आला, आणि उभयतांमध्ये चांगलेच वैमनस्य आलें.

 तथापि जाधवराव हा, मोंगलांनी लालूच दाखविल्यामुळेच नव्हे, तर शहाजीचें निजामशाहीत परमावधीस पोहोलेले महत्त्व त्यास सहन न झाल्या- मुळे, आणि शहाजीविषयीं त्याच्या हाडीं मार्सी खेळत असलेल्या द्वेषामुळे- तो निजामशाही पक्ष सोडून मोंगलास जाऊन मिळाला असेच म्हणावे लागतें. मलिकंबर जिवंत असतांनाच शहाजीचे महत्त्व परमावधीस गेले होतें. दुसरा मूर्तुजा निजामशहा मृत्यू पावला, त्यावेळी त्याचे दोन्ही मुलगे अगदींच अज्ञान, म्हणजे सात सात वर्षांचे होते. परंतु या मुलांची आई मोठी हुषार व कर्तृत्ववान होती. या वेळी अनंत साबाजी या नावाचा एक मोठा हुषार, मुत्सद्दी व राजकारणनिपुण पुरुष निजामशाहीत होता; त्याच्या सल्ल्यानें राजमातेनें शहाजीस निजामशाही राज्याचा सर्व अधिकार सोपविला. त्यामुळे शहाजी हा बालराजा मूर्तुजा निजामशहा ( तिसरा ) यांस आपल्या मांडीवर घेऊन दरबारांत तख्तावर बसत असे. व सर्व सरदारांना आणि जाधवराव हाही एक सरदार असल्यामुळे त्यालाही दरबारांत आल्यावर तख्तापुढे कुरनिसात करावी लागत असे. परंतु जाधवरावास त्याबद्दल अति शय वाईट वाटत असे आपल्या देवडीवर असलेल्या मालोजीचा मुलगा-