पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३९)

तसली नवीन संवय संपादन करण्याची कलही त्यांनी अद्याप दाखविलेला नव्हता. वैश्यवृत्तांचा दुसरा भाग जो शेतकी तो वैश्यांनीं सोडून दिल्यामुळे शूद्रांच्या हाती सर्वस्वी जाऊन कुणबी म्हणून एक वर्ग आस्तत्वात येऊन त्या काली शेकडों वर्षे लोटलीं होत. पाणिनीकालीन अनिरवसित शूद्र प्रागार्यकालीन नागलोक, वैश्यवर्ण व क्षत्रिय वर्ण ह्या चार लोकांचे पुरातन कालीं शरीर- संबंध होऊन महाराष्ट्रांत कुणबी ऊर्फ कुलपति हा वर्ग निर्माण झालेला होता. ह्या वर्गातील लोक कधीं मोलमजूरीची शूद्रकमें करून कधीं वाणिज्यादि वैश्य कर्मे करून,व कधीं शिपाईगिरीचें क्षात्रकर्म करून प्रायः कृषि कर्माहि वैश्य धर्मात गढलेले असत; आपण जातांचे शूद्र आहो, वृत्तीनें वाणी आहों, व आपल्या पूर्वजांनी रामदेवराव जाघवाच्या आमदानीत लढायांत भाग घेतला होता, असे जे स्वतः तुकाराम व त्याचा कुळकट म्हणतो त्याची आणि वरील विधानाची एकवाक्यता येणे- प्रमाणे इतिहासप्रसिद्ध आहे. शहाजीकार्ली सैन्यांतून सामान्य शिपायांचा ज़ो हजारोंनी भरणा होत असे तो ह्या सुप्रज व बहुप्रज कुणबी ऊर्फ कुल- पती यांच्यांतून होई. ह्या सामान्य शिपायांना मुत्सद्देगिरी, राजकारण इत्यादि बडा व्यवहार करण्याची ऐपत नसे; परंतु मोसमत शेतकाम करून, बाकीच्या काळांत शिपाईगिरीवर पोट चालविण्याची धमक ह्या कुणबी लोकांत उद्भवली होती; जो जास्त पोटगी देईल त्याची शिपाईगिरी करण्यास व त्याचा पाईक होण्यास हा वर्ग उत्सुक असे; मग तो धनी हिंदु असो की यवन असो, जुना असो की नवा असो, देव फोडणारा असो की जोडणारा असो; शिपाईगिरीची धामधुम करून लढाऊ राज्ययंत्राचा अंश होणारा असा हा कुणबी वर्ग त्या काली महाराष्ट्रांत होता. कशाकरितां लढावयाचें व कदा- चित् लढून मरावयाचें- तर केवळ पोटाकरितां, अशांतला हा वर्ग होता. ह्या वर्गाच्या वरचा वर्ण म्हणजे क्षत्रिय जे मराठे त्यांचा; मराठ्यांत दोन धंदे करणारे लोक होते. देशमुख्या, पाटिलक्या, चौगुलक्या, मोकदम्या, पट वाया, मोकाश्या, वगैरे करणारा वृतिवंत मराठ्यांचा पहिला वर्ग, आणि केवळ शेतकांवर निर्वाह करणाऱ्याा गरीब मराठ्यांचा दुसरा वर्ग; हा दुसरा वर्ग आप- णाला मराठा कुणबी म्हणून म्हणवी. शूद्र कुणबी निराळा आणि मराठा कुणचं,