पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३८)

सूत्रचालक असून, तो मालोजीप्रमाणेच शहाजीचीही कर्तबगारी ओळखून होता; त्यामुळे त्यानें शहाजीस लागलीच मनसबदारीची वस्त्रे दिलीं; तथापि तीं मिळण्यास वर्ष दीड वर्षांचा कालावधि लागला, आणि " मालोजांच्या मृत्यू - नंतर मालोजीची सर्व जहागीर व सैन्य यांचें आधिपत्य दरबारी शिरस्त्या- प्रमाणे वर्ष दांड वर्षांनें शके १५४३ दुर्मति संवत्सरी शहाजीस प्राप्त झालें " असा बृहदीश्वर शिलालेखांत उल्लेख आहे.

 शहाजीच्या पूर्वचरित्राचे विवेचन करण्यापूर्वी तत्कालीक राजकीय परि- स्थितीसंबंधी थोडक्यांत विवेचन करणे अत्यावश्यक आहे; रा. राजवाडे यांनीं राधामाधव-विलास-चंपू या काव्यग्रंथांत या बाबतींत मोठें मननीय विवेचन केले आहे, ते असें कीं, “ त्या काली सध्याच्या प्रमाणेच महाराष्ट्रांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, व अतिशुद्र असे पांच वर्ण असून मुसलमान व रानटी अनार्थ असे दोन हिंदुबाह्य लोकसमूह असत्त. पैकीं कातकरी, कोळी, ठाकूर भिल्ल इत्यादि संपूर्ण किंवा अर्धवट रानटी अनार्यबाह्यांना तत्कालीन राज्य- यंत्राचा अर्थ कळण्याची ऐपत नसल्यामुळे, तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या अवलोकनक्षेत्रांतून त्यांना वगळावे लागतें. हे रानटी अनार्य लोक शिपाई- गिरीहि करण्याच्या लायकीचे नव्हते, आणि मुत्सद्देगिरीची आकांक्षा तर त्यांच्या मनोभूमीत अंकुरित होण्याचा यत्किंचितही संभव नव्हता. रामराव- गादीच्या पुरातन कालापासून तो अद्यापपर्यंत हे वनचर स्थितीत आहेत. चांभार, घेड, महार, मांग, इत्यादि अतिशूद्र यद्यपि वनचर स्थित तून प्रामचर स्थितीत आलेले होते, तत्रापि शिपाईगिरी किंवा मुत्सद्दोगरी त्यांच्या स्वप्नसृष्टीतहि उदय पावलेली नव्हती. गांवांतील गलिच्छ व काबाड- कष्टाचे बिनभानगडांचे धंदे करून व चोन्यामाया करून पोटभर भाकर मिळ- विण्यांत ह्यांची सर्व रग जिरत असल्याकारणानें राजयंत्राचे अवयव होण्यास त्यांना अवकाश नव्हता. व्यापार व शेतकी ही जी मनुप्रणित वैश्यवृत्ति ती ह्या काळी दुभंग होऊन व्यापारी व शेतकरी या दोन वर्गात वांटली गेली होती. निव्वळ व्यापारधंदा व शिल्पकला करणारे जे सोनार शिंपी, तांबट इत्यादि कारुकर्मे त्यांच्या अनेक जाति बनून ते आपापल्या धंद्यांत निमन असून, त्यांना राज्ययंत्रांत घालमेल करण्याची पिढीजाद संवय नव्हती; व