पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ३५४) मिळून बरेच उत्पन्न असून, तंजावरचें मराठा राज्य नष्ट झाले तरी " तंजावरचें राजघराणे " हें नांव आजतागायत दक्षिण हिंदुस्थानांत अस्तित्वात आहे.

 तंजावरच्या दुर्दैवी संस्थानाची - मराठ्यांच्या थेट दक्षिणेकडील छोटे- खानी लष्करी वसाहतीची शोचनीय हकीकत थोडक्यांत वर लिहिल्याप्रमाणें आहे. "इकडे मराठा संघानें मोंगलांच्या फोजेंश लहून आपली इभ्रत कायम राखेिली, व वीस वर्षे झगडून गेलेले स्वातंत्र्य परत मिळविलें, तर तिकडे या वसाहतवाल्यांनी मराठा संघांत सामील होण्याचें नाकारून, आपलें आपण रक्षण करण्याच्या भानगडीत, कर्नाटकमधील लढायांच्या फेयांत मात्र आपणांस पाडून घेतले. त्यानंतर इ० सन १७६२ पासून प्रमुख • स्वतंत्र संस्थानांतून तंजावरचें नांव रद्द झाले. या तंजावर संस्थानानें महाराष्ट्र- मातेशीं आपला असलेला संबंध जर तोडला नसता तर, इ० सन १७६२- १७९२ पर्यंत मराठ्यांनी ज्या ज्या स्वाच्या केल्या, व ज्या स्वाप्यांत त्यांना नेहमी यशच मिळत गेले, व ज्यांत हैदर व टिपू यांना जबर खंडणी व पुष्कळ मुलूख देणे भाग पडून नंतर कांहींसा या स्वान्यांचा जोर कमी झाला, त्या स्वान्यांत या संस्थानाचे मोठे नांव झाले असते, यांत कांहीही संशय नाहीं. त्याचप्रमाणे, वरील कारणामुळेच, म्हणजे त्या संस्थानाने मराठा संघा- पासून अलग राहून, आपली आपण सोय पाहिली, या कारणामुळेच गुत्ती संस्थानाचांही दुर्दशा झाली. ह्या छोटेखानी वसाहतीच्या हकीकतीपासून जो घडा शिकावयाचा आहे, तो हाच आहे. आणि मराठा साम्राज्य जुटीनें अस तर प्रबळ, पण जर का जूट फुटली, तर आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या कार्मी कुचकामाचें; मराठा साम्राज्याची शक्ति व त्याचे दौर्बल्य, यांची कल्पना ही याच घड्यापासून उत्तम प्रकारें होत आहे.” ( Rise of the Maratha Power; Page 253-255 ) आणि इतभागी अशा या तंजावरच्या राज्याच्या उच्छेदाचा इतिहास वाचल्यावर त्याबद्दल कोणालाही अत्यंत खेद वाटल्याशिवाय राहणार नाही, हे उघड आहे.

समाप्त.