पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३५३ ) बहादूर + चांस दिली होती; तिचे नांव लक्ष्मीबाईसाहेब, [पहिल्या चिमणा- बाईसाहेब ] हैं असून ती अल्पवयांतच एक पुत्र होऊन मृत्यु पावली. याच मुलाचें नांव फत्तेसिंह हे होतें. युवराज फत्तेसिंहराव हा इ. सन. १९०८मध्यें बडोदें येथें मृत्यू पावला. त्यास प्रतापसिंह या नांवाचा एक मुलगा व दोन कन्या आहेत; व हाच तंजावर येथील राजघराण्याचा आज मित्तीस शिल्लक राहिलेला कन्येचा वंश आहे. तंजावरच्या राण्यांनी आपल्या खाजगी दोलतीकरितां शिवाजीराजे व प्रतापसिंहराजे हे दोन मुलगे दत्तक घेतले होते, व त्यांना इंग्रजसरकारकडून नेमणुका मिळत होत्या. शिवाय तंजावरच्या राजघराण्याकडे खाजगी मोकाशाची १९० गांवें व जमिनी वगैरे व + मराठेशाहींत खालीलप्रमाणे किताब होते, तेः— १ शिंदे - अलिजाबहादूर. -- ● २ होळकर - सुभेदारसाहेब. ३ गायकवाड - सेनाखासखेल समशेर - बहादूर. ४ भोंसले- सेनासाहेब सुभा. ५ अग्रेि-वजारतमाहा सरखेल. ७ कंपनी - इंग्रजबहादूर. - ८ टिपू सुलतान बहादूर. ९ सुरापूरकर नाईक-बहिरीबहादूर. १० घोरपडे-सेनाधुरंधर. ११ वाडीकर सांवत-राजे सांवत बहादूर ६ नारो शंकर-राजे बहादूर. - • १२ विंचूरकर - उमदेतुल्मुल्क बहादूर हैद्राबादकर निजाम याचा किताब " मुज्फर उल् मुमालिक निजामउलू- मुल्क नीरफर खंदे अल्लीखान बहाद्दर फत्तेजंग " पत्रव्यवहारांत त्याचा उल्लेख " हैद्राबादकर " व केलेला आढळतो. हा असून मराठशाहीतील 66 भागानगरवाले " असा

  • लग्न ता. ६ माहे जानेवारी इ. सन १८८० रोजीं बडोदें येथें नजर

पागेंत झाले. १ फत्तेसिंहाचा जन्म ता. ३ आगष्ट इ. सन १८८३ २ तंजावरकर चिमणाबाई महाराणी हिचा मृत्यु क्षयरोगानें ता. ७ मे १८८५ साली झाला. त्यावेळी तिचे वय २१ वर्षांचें होतें.