पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५१ )

१७९९ मध्ये, तंजावरकर व इंग्रज यांच्यामध्ये तह होऊन तंजावरची राज सत्ता पूर्वीच कंपनीसरकारच्या हातांत गेलेली होती. परंतु तसा तह न होतां व तशी राजसत्ता इंग्रजांच्या हातीं न जातां जरी ती इ० सन १८५५ पर्यंत तंजावरकरांच्याच हातो राहिली असतां तरीसुद्धां औग्स संततीच्या अभावों, डलहौसीच्या कारकीर्दीत तें संस्थान - जेथे नागपूरसारखें बड़े राज्यही जिवंत राहिले नाहीं, तेथे हें तंजावरचें छोटे संस्थान- जिवंत राहणें शक्यच नव्हते, हे उघड आहे. परंतु तंजावरची राजसत्ता तर आधीच इंग्रजांच्या हातों गेलेली होती. त्यामुळे लॉर्ड डलहौसी यानें तंजावरचें राज्य खालसा केलें, अर्से म्हणण्यापेक्षां, पूर्वीच इ० सन १७९९ मध्ये खालसा केलेल्या तंजावर राज्याच्या राज्यकर्त्यांचा तेथील गादीवरील नामधारी हक्क त्यानें इ० सन १८५५मध्ये औरस संततीच्या अभाव, काढून टाकून, तें राज्य राजरोसपणें त्यानें ब्रिटिश साम्राज्यांत सामील केल्याचे जाहीर, केले असेच म्हणणे अधीक संयुक्तिक होईल, हे उघड आहे.

 शिवाजीराजे इ० सन १८५५ मध्ये ( ता० २९ आक्टोबर ) तंजा- वर येथे मृत्यु पावला. त्यांस सयदंबाबाई, पद्मांबाबाई, व कामाक्षी अंबाबाई अशा तीन स्त्रिया होत्या. त्यांपैकी त्याच्या पहिल्या दोन्ही स्त्रिया त्याच्या हयातीतच मृत्यु पावल्या. तिसरी कामाक्षी अंबाबाई ही इ० सन १८९२ पर्यंत हयात होती. शिवाजी राजे यांस सयदंबाबाईपासून फक्त दोन कन्या झाल्या. पुत्रसंतती झाली नाहीं. म्हणून त्याने आणखी सतरा लग्नें केली तरी सुद्धां अखेरीस औरस संतती झाली नाहींच. त्यापैकी अकरा राण्या व सर्वात वडील राणी कामाक्षी अंबाबाईसाहेब ह्या शिवाजी राजाच्या मार्गे पुष्कळ वर्षे जिवंत होत्या. शिवाजी राजे मृत्यू पावल्यावर त्याच्या राण्यांस नेमणूका होऊन त्यांना राज- वाड्यांत राहण्याची परवानगी मिळाली. परंतु त्यांची खाजगी मालमत्तासुद्धो त्यांच्याकडून काढून घेण्यांत आली. परंतु कामाक्षीअंबा व इतर राण्यांनी तंजावरचें राज्य परत मिळविण्याबद्दल पुष्कळ खटपट केली व ईस्ट इंडिया कंपनीबरोबर आपली खाजगी मिळकत परत मिळविण्याबद्दल पुष्कळ वर्षे त्यांनी कज्जा चालविला. त्यांची राज्य परत मिळविण्याची