पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५० )

पहा) थोडक्यांत सांगायचे म्हणजे लॉर्ड डलहौसांच्या कारकीर्दीत, पंजाब व् खालील ब्रह्मदेश हे युद्धांमुळे, आणि सातारा, झांशी व नागपूर हीं संस्थानें औरस पुत्रसंततीच्या अभाव खालसा होऊन इ० सन १८५४ पर्यंत हिंदुस्थान- तील ब्रिटिश साम्राज्यांत सामील झाली व त्यानंतर इ० सन १८५६ मध्यें ता० ७ फेब्रुवारी रोजी " असह्य अव्यवस्थित राज्यकारभार " या मुद्दयावर औधवा वजीर वाजिद अल्लोशाहा, यास पदभ्रष्ट करून, लॉर्ड डलहौसी यानें तें औघचें राज्य ब्रिटिश साम्राज्यांत सामील केले व तो महिना संपण्याच्या पूर्वीच त्यानें गव्हर्नर जनरल या नात्याची अधिकारसूत्र लार्ड क्यानिंग याच्या हवाली करून तो इंग्लंडांत परत गेला. म्हणजे इ० सन १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसी याची गव्हर्नर जनरल या नात्याची कारकीर्द हिंदु- स्तानांत सुरू झाल्यानंतर इ० सन १८४९ पासून निरनिराळ्या मुद्द्यांवर व कारणांनी, एतदेशीय राज्ये खालसा करून ती ब्रिटिश साम्राज्यांत सामील करीत राहाण्याचें जे राजकीय धोरण त्याने अमलांत आणिलें होतें, तें इ० सन १८५६ च्या फेब्रुवारी महिन्यांत तो आपली अधिकारसूत्रे क्यानिंग याच्या हवाली करून इंग्लंडमध्ये परत गेला, तोपर्यंत सारखें चालूच ठेविलें होतें. अर्थात् ज्या ठिकाणी नागपूर व औधसारखी बडीं बड़ी संस्थानें इ० सन १८५४ व इ० सन १८५६ मध्ये खालसा झाली, त्या ठिकाणी तंजा- वरसारखें छोटे संस्थान " औरस संततीच्या अभाव" मधील इ० सन १८५५ या वर्षात जिवंत राहणें शक्यच नव्हते. शिवाय इ) सन १७९९ मध्ये [ता० २५ आक्टोंबर] तंजावरकर सरफोजी राजे व इंग्रज यांच्यामध्यें झालेल्या तहाअन्वयें तंजावर संस्थानची सर्व राजसुतें व सर्व राजसत्ता पूर्वीच इंग्र जांच्या हातांत गेली होती; आणि तंजावरचा राज्यकारभार " तेथील राज्य- कर्त्यांच्या नांवानें " इंग्रज चालवीत असल्यानें, तंजावरकर हे इ० रुन १८५५पर्यंत नामधारी राज्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. इ० सन


मान्य करण्यांत आले असून, त्यामुळे लॉर्ड डलहौसी याचें हें एतद्देशीय राज्ये खालसा करण्याचे तत्व, व्यवहारदृष्टया पूर्णपणे रद्द करण्यात आलें, त्या गोष्टीचाही या ठिकाणी उल्लेख करणें अस्थानीं होणार नाहीं." (Page 329 )