पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३७ )

नबाब त्याचें व सुरतचें राज्यही खालसा झालें. म्हैसूरचें [ मुसलमानी ] राज्य नष्ट होण्याने दोन महत्त्वाच्या गोष्टोंनी हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्याची प्रगति झाली. त्यांपैकी पहिली ही की, त्यामुळे दक्षिण हिंदुस्थानांतील इंग्रजांच्या प्रदेशाला सतत तीस वर्षेपर्यंत ज्या त्यांच्या कट्या दुष्मनाच्या स्थितीमुळे धोका असे, त्या दुष्मनाचा काटा आर्ता पार उखडून टाकण्यांत आला; आणि दुसरी ही की, हिंदुस्थानच्या द्वीपकल्पाच्या खालील भागाजवळील समुद्रकिनारा त्यांच्या पूर्ण आधिपत्याखाली येऊन, त्यामुळे फ्रेंचांकडून होणा-या उपद्रवाची भीत पुष्कळच प्रमाणाने नाहीशी झाली. शिवाय, "कर्नाटकच्या नबाबीवर कोणाची हुकमत ? " या प्रश्नाच्या स्वरूपाच्या ज्या सत्तेबद्दल डले व क्लाईव्ह यांच्या वेळी फ्रेंच व इंग्लिश यांच्यामध्ये कडाक्याचें युद्धकलह झाले होते, ती कर्नाटकची नबाबी सत्ताही त्यामुळेच वास्तविकरीत्या नाहीशी झाली. कर्ना- टकच्या नवाबीवरील हुकमतीसंबंधाच्या ह्या चाललेल्या युद्धकलहांत इंग्लिश लोक विजयी झाल्यानंतर, त्यावेळेपासून संरक्षित दोस्त सरकार व मांडलीक राज्यकर्ता या स्थितीतून येथील नवात्राचे रूपांतर होत होत तो निव्वळ नामधारी सत्तेचे बाहुलें, या स्थितीत येऊन पोचलेला होता. कंपनी सरका रकडून त्याचे संरक्षण होत असे. परंतु त्याबद्दल कुमकेदाखल मिळालेल्या तैनाती फौजेचा खर्च पुरा पाडण्यांत त्याच्या बहुतेक सर्व उतन्नावर टांच बसली होती. आणि तो अशा कष्टदायक स्थितीत आलेला असल्यामुळे, त्यानें स्वाभाविक रत्यिाच आपल्या सावकाराचा शत्रू असलेल्या म्हैसूरच्या सुलताना- बरोबर गुप्तरीतीनें पत्रव्यवहार सुरू ठेविलेला होता. म्हैसूर इस्तगत झाल्या- वर इंग्लिशांना त्यांची पत्रे सांपडली. त्यामुळे लार्ड वेलस्ली याला, बाह्य राज कीय कारस्थान आणि अंतस्थ अव्यवस्थित राज्यकारभार, या जोड मुद्दयावर कर्नाटक सर्वस्वी इंग्लिशांच्या राज्यकारभाराखाली आणण्याला आपणाला न्यायदृष्टया पाहतां पूर्ण अधिकार पाँचतो, असे आढळून आलें. शिवाय, दुद्दाती विभागलेली सत्ता, ही पद्धत देशाला अत्यंत अनिष्टकारक आहे, असें त्याचें म्हणणे असून याच निर्विवाद कारणाकरितां त्यानें तंजावर आणि सुरत
२२...२३