पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(३१५ ) केली. त्यानंतर तंजावर येथें अनेक राजकारणे घडून आली, आणि शेवटीं अर्काटचा नवाब महंमदबल्ली यानें मध्यस्थी पडून, प्रतापसिंहाकडून मुरारराव घोरपडे यांस तीन लक्ष रुपये खंडणी देण्याचें कबूल करून, त्याचें सैन्य तंजा- वर प्रांतांतून परत फिरविले. या वेळी या तीन लक्षांपैकी पन्नास हजार रुपये प्रतापसिंहानें मुराररावास रोख दिले; व मुराररावाची घाड तंजावर प्रोतांतून परत गेली. त्यानंतर प्रतापसिंहास जो थोडासा शांततेचा लाभ झाला, त्या अवधीत त्याने फ्रेंन्यांनी उध्वस्त करून टाकलेले मेलूरच्या कालव्याचें धरण, आपलें, व कांही इंग्रजी सैन्य त्या ठिकाणी त्याच्या संरक्षणाकरितां नेहमी सज्ज ठेवून, दुरुस्त केलें; व तंजावर राज्याच्या सुपीकतेचें हें फ्रेंच्यांनी नष्ट करून टाकिलेले मुख्य साधन त्याने पुन्हां पूर्वीप्रमाणे सुस्थितीत आणून ठेविलें.

 त्या नंतर इ० सन १७५८ पर्यंत तंजावरच्या राज्यास कांहींशी स्वस्थता लाभली. परंतु याच वर्षी फ्रेंच सरदार काउंट लाली यानें तंजावरवर स्वारी केली. तंजावरचा राजा प्रतापसिंह हा इंग्रजांच्या पक्षाचा, त्यामुळे फ्रेंचांची त्याच्यावर पहिल्यापासूनच करडी नजर होती. शिवाय मद्रासवर स्वारी कर- ण्याला या वेळी फ्रेंचाजवळ पैसाही नव्हता. त्यामुळे तंजावरवर स्वारी करून पैसे काढण्याची मसलत लाली यांस कौन्सिलनें दिली; आणि इ० सन १७४९ मध्ये प्रतापसिंहानें चंदासाहेबास जो छपन्न लक्ष रुपयांचा कागद लिहून दिला त्या आधारानें ही रक्कम वसूल करण्याची फ्रेंचांनी युक्ती योजिली. लाली यांस कौन्सिलची ही मसलत फारसी आवडली नाहीं. तथापि नाइलाजामुळे ती त्यास कबूल करणे प्राप्त झाले. त्याप्रमाणे लाली हा कारिकल* बंदरांत उतरून रस्त्यानें देवळें, व नागूर, + किव्हालूर, वगैरे गांव लुटीत, व तंजावरच्या


 * कारिकल, हें बंदर कारोमांडल किनाऱ्यावर, तंजावर जिल्ह्यांतील नागापट्टम् या शहरापासून १२ व ट्रॉकिबारपासून ६ मैलांवर आहे.
 + नागूर हे नागापहम्च्या उत्तरेस तीन मैलांवर वेलारनदीच्या मुखाशीं एक गांव व बंदर आहे.
 ÷ किन्दालूर हे नागपट्टम् पासून सात मैलांवर असून ते हल्लों एक रेलवे- स्टेशन आहे.