पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१४)

प्रकारें मिळाला तर नाहींच, पण उलट त्याच्या शौर्याची व पराक्रमार्च। कीर्ति या वेळी विशेषच वृद्धिंगत झाल्यामुळे प्रतापसिंहाचा दिवाण, जो मानाजी- रावाचा शत्रू सखूजी नाईक याची मत्सरबुद्धि प्रदीप्त झाली आणि त्याने प्रताप- सिंहाचें मन कलुषित करून, मानाजीरावास पुन्हां अधिकारावरून दूर करविले.

 तथापि मानाजीराव अधिकारच्युत झाला नाहीं तोंच तंजावरच्या राज्यावर पुन्हां फ्रेंच्यांची धाड येऊन पडली. फ्रेंच सेनापति मॉनशियर मेसीन हा आपल्या बरोबरीच्या तीन हजार पायदळ, व दोन हजार घोडेस्वार, यांसह तंजावरच्या प्रांतांत शिरला ( इ० सन १७५४, मे० ) व कोन्हिलाडी ऊर्फ कोईलाडी हे गांव हस्तगत करून घेऊन त्यानें तेथे फार लूटमार केली. इतकेच नाहीं, तर तंजावर प्रांताच्या सुपीकतेचें मुख्य साधन जें मेलूरच्या प्रसिद्ध कालव्याचें घरण, तेही उध्वस्त करून त्याने तिकडे मोठाच अनर्थ मांडला. तेव्हा प्रतापसिंहानें मल्हारजी गाडेराव या आपल्या नातेवाईक सर दाराच्या हातांखालों पंधराशे स्वार देऊन त्याची फ्रेंचांवर रवानगी केली. इतक्यांत गुत्तीकर मुरारराव यानें, तंजावरवर हल्ला करण्यास ही उत्तम संधि आहे असे पाहून, आपणाबरोबर तीन हजार घोडेस्वार घेऊन तंजावरवर चाल करून आला. तंजावरच्या सैन्याची धूळधाण उडविली व तंजावर शहर लुटून फस्त केले. अशी एकाच वेळी दोन संकटें ओढवल्यामुळे प्रतापसिंह गोंधळून गेला; व त्याने मदत पाठविण्याविषयी मद्रासकर इंग्रजांकडे निकडीची मागणी केली. तेव्हां इंग्रज सेनापति मेजर लॉरेन्स याने कॅप्टन कॅलियड यांस प्रतापसिंहाकडे भेटीस पाठविलें व हें संकट टाळळ्याकरितां कोणते उपाय योजावेत, तें सांगून पाठविले. त्याप्रमाणे कॅप्टन कॅलियड व प्रतापसिंह यांची भेट होऊन तह झाला. व इंग्रजांनी तंजावरकरास मदत पाठविली. तंजावरचा दिवाण व सेनापति मानाजीरावाचा शत्रु सखूजी नाईक हा फ्रेंचास अनुकूल असून इंग्रजांस प्रतिकूळ होता. त्यामुळे त्यास तंजावरच्या राज्यांतून हद्दपार केल्याशिवाय प्रतापसिंहाशों आपलें खरें सख्यत्व होणार नाही, असे इंग्रजांस वाटत होतें. म्हणून त्यांनी प्रतापसिंहामार्फत सखूजी नाइकाला सहकुटुंब तंजा- वरच्या राज्यांतून हद्दपार करविले आणि मानाजीराव यांस प्रतापसिंहाने पुन्हा कामावर घेऊन त्याची दिवाण व सेनापति या दोन्ही अधिकारांवर स्थापना