पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०६)

मदत देण्याचे कबूल करून त्याप्रमाणे क्यॅप्टन कोप याच्या हातांखाली ४३० युरोपियन व १०० एतद्देशीय सैन्य देऊन, त्याची शहाजीबरोबर तंजावरच्या स्वारीवर रवानगी केली (इ सन १७४९ एप्रिल ). ही बातमी प्रताप- सिंहास कळल्यावर त्यानें मानाजी जगतापमार्फत मद्रासकर इंप्रजास खरी वस्तु- स्थिति कळविली. वास्तविक इंप्रजांचा हेतू देवीकोटा+मिळविण्याचा असून त्यांना शहाजीची विशेष पर्वा नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रतापसिंहाचें म्हणणे बिलकूल विचारात घेतले नाहीं. इकडे क्यॅप्टन कोप हा आपल्या सैन्यासह तंजावर- जवळ आला. तेव्हां प्रतापसिंहाची फोज स्पाजबरोबर लढण्यास पुढे आली. परंतु तंजावरकराच्या सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही असे पाहून कॅटन कोप देवकोटाकडे परत गेला. परंतु तेथे त्यास इंग्रजी आरमार दिसले नाही. म्हणून तो सेंट डेव्हीडच्या किल्लथावर परत निघून गेला. नंतर मद्रासकरांनी देवीकोटा घेण्याकरितां मेजर लारेन्स याच्या हाताखाली आणखी नवीन सैन्य देऊन त्याची समुद्रमार्गानें तिकडे रवानगी केली. तेव्हां तंजावर- करांनीही देवीकोट्याचें रक्षण करण्याकरितां तिकडे आपले सैन्य रवाना केले. व त्या ठिकाणी उभयतांमध्ये युद्धप्रसंग सुरू झाले; व त्यांत इंग्रज सैन्याची सरशी झाली. इतक्यांत आपला कट्टा हाडवैरी चंदासाहेब हा मराठयांच्या कैदेतून मुक्त होऊन-चंदासाहेबास प्रतिबंधांतून मुक्त करण्याबद्दल सात लाख रुपये दंड भरण्याची जामिनगिरी फ्रेंच सरदार डुप्ले यानें आपल्या अंगावर घेऊन तसे मराठा दरबारास कळविले, व डुप्लेची जामिनगिरी मराठथांनी कबूल करून व " मी तंजावरच्या राजास बिलकुल त्रास देणार नाहीं. " असा खुद्द चंदासाहेबाजवळून करार करून घेऊन, त्यास बंधमुक्त करून त्याच्या बरोबर तीन हजार स्वार बंदोबस्तासाठी देऊन त्यास इ० सन १६४८ च्या प्रारंभी कर्नाटक प्रांतांत रवाना केले. तंजावरवर चाल करून येत आहे, असे प्रतापसिंहास समजले. तेव्हां प्रतापसिंहानें मेजर लारेन्स


 + देवीकोटा हे शहर तंजावर जिल्ह्यांत कारोमांडल किनान्यावरील ट्रॉक्किबारच्या उत्तरेस चोवीस मैलांवर, कोलेरून नदीच्या मुखाशीं असून तेथे मोडकळीस आलेला एक लहान किल्ला अस्तित्वात आहे.