पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३०५ )

 त्यानंतर इ० सन १७४९ पर्यंत तंजावरच्या इतिहासांत विशेष मह स्त्वाच्या गोष्टी घडल्या नाहीत. परंतु इ० सन १७४९ पासून तंजावर येथे पुन्हां राजकीय तंटे सुरू होऊन युद्धास प्रारंभ झाला. इ० सन १७३९ मध्ये सयाजी ऊर्फ शहाजी हा पदभ्रष्ट होऊन प्रतापसिंह गादीवर आला. त्यावेळे- पासून दहा वर्षे होऊन गेली तरी सुद्धां त्याचे राज्यप्राप्तांचे प्रयत्न सुरू होते, व स्वतःच्या फायद्यासाठों भावी काळांत आपले स्वतःचेंच व राज्याचे पाहिजे तें नुकसान करण्यास तो सिद्ध झाला होता. कर्नाटक प्रांतांत इंग्रज- फ्रेंचाचे युद्धप्रसंग सुरू होऊन, कर्नाटकमधील पहिले युद्ध, युरोपांतील ए- ला- शापेल येथील तहाने ( इ. सन १७४९ जानेवारी ) बंद झाले न झाले तोंच, "आपण इंग्रजांची मदत मिळवून त्यांच्या साह्यानें तंजावरची गादी मिळवावी " असा शहाजीनें बेत ठरविला; व प्रतापसिंहाचे फ्रेंच्याशीं सख्य असल्यामुळे त्यानें मद्रासकर ईस्ट इंडिया कंपनीकडे संधान बांधिले. " आप- णच तंजावरच्या गादीचे खरे वारस अहों, व आपला तेथील गादीवरील हक तंजावर येथील प्रमुख सरदारांनी व लोकांनी मान्य केला आहे. "अशी मद्रास येथील गव्हर्नरास खोटी थाप दिली, व " आपणास मदत केल्यास मदतीबद्दल देवीकोटा शहर, त्याच्या आजूबाजूचा प्रदेश व युद्धाचा खर्च देऊं. " असे त्याने मद्रासकर इंग्रजांना अभिवचन दिले; व इंग्रजांनीही त्यास


 पाठविला, तदनंतर खानमजकुरांनी महाराजांस वस्त्र पाठवून, महाराजांकडूनही आपण वस्त्र पत्र पावून समेट केला. "

 उलटपक्षों याच दोन युद्धांची हकीकत अनवरुद्दीनखानानें ता० २३ जून इ० सन १७४४, व ता० २१ आक्टोबर इ० सन १७४५ या दिवश मद्रासच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रांत अगदर्दीच भिन्न दिली असून, त्यांमध्ये तंजावरच्या फौजेचा आपण पूर्णपणे पराभव करून मोठा विजय संपादन केला, अशी फुशारकी मारली आहे; (व्यंकार स्वामीरावकृत “Manual of the Tanjore District, " हे पुस्तक पहा. ) अर्थात् वरील दोन्ही हकीकतीपैकी कोणती खरी मानावी हे निश्चितपणे ठरवितां येत नाहीं.
२०