पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३०१ ) मधून तारबुरता तरी नाहींसा झाल्यामुळे पुढील आठ वर्षात त्याच्याकडून होणाच्या त्रासापासून तंजावरचें राज्य मुक्त झालें. तथापि त्यानंतर चारच वर्षांनी तंजावरच्या राज्यावर पुन्हां दुसरे संकट ओढवले. दख्खनचा राज्यकर्ता निजामउल्मुल्क हा कर्नाटक प्रांतात आपली राजसत्ता सारखो वृद्धिंगत करीत होता, त्यानें इ० सन १७४४ मध्ये त्रिचनापल्लीचा किल्ला मुरारराव घोरपडे याच्यापासून हस्तगत करून, तो अनवरुद्दीनखान याच्या ताब्यांत देऊन ( इ० सन १७४४ एप्रील ) त्यास अर्काटच्या नवाबगिरोबर (सफ्तरअलीचा मुलगा सय्यद महंमदखान याच्या तर्फे ) नेमिलें, आणि कर्नाटक प्रांत आपल्या ताब्यांतील, व तेथील नबाब आपला अंकित आहे, असे त्यानें सर्व लोकांस जाहीर केले. त्याप्रमाणें -

  • कर्नाटकाचा नबाब सफ्तरअल्ली: याचा, इ. सन १७४२ मध्ये, मूर्तुजा-

अल्ली यानें वेलोर येथें खून केला. व अर्काट येथे जाऊन त्यानें नवाबाचें पद धारण केले. परंतु त्यानंतर अनेक पक्ष निर्माण होऊन त्यांपैकी कर्नाटकाच्या नबाबाची वंशावळ नवाब खान सादतउल्ला, ( इ. सन १७१०-३२) दोस्त अल्लो (इ.. सन १७३२-४०) । 1 बफ्तर अल्लो खान असनभली मुलगी, लम १७४०-४२ I सय्यद महंमद खान १७४२-४४ बाकरअल्ली (वेलारचा कारभारी) } मूर्तुजाअल्ली T मुलगी मूर्तिजाअल्लांशी लमचंदा साहेबाशी