पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३००)

चिमणाजी ऊर्फ चिमाजी आप्पासह ता० २५ मे इ० सन १७४० रोजी पुणे येथे, व नंतर ता. १३ जून रोजी सातारा येथे गेला; - यास, ता. २५ जून रोजी, ( आषाढ शुद्ध १२ बुधवारी सकाळी दहा वाजतां ) सातारा मुक्कामी पेशवाईची वस्त्रे अर्पण केली. अशा रीतीनें रघूजीचा मानस सिद्धीस न गेल्यामुळे, तो बाबूजीनाईक यास बरोबर घेऊन कर्नाटकांत आला. चंदा- साहेबावरील स्वारीची कडेकोट तयारी केली; कर्नाटकांतील हिंदुराजे, पाळेगार मुशररार घोरपडे गुत्तोकर, व तंजावरकराचें सैन्य, आपल्या मदतीस घेतलें; व या सर्व सैन्यासह त्रिचनापल्लीवर चाल करून जाऊन मराठयांनी तेथील किल्लयास वेढा दिला. त्रिचनापल्लीचा किल्ला बळकट असल्यामुळे, तो चंदासाहेबानें कांही दिवस मोठया शौर्याने लढविला. परंतु किल्लयांतील सामुग्री संपत आल्यामुळे मराठ्यांशी टक्कर देणे त्याला अशक्य वाटू लागले. म्हणून त्याने मराठ्याशी किल्ला स्वाधीन करण्याबद्दल बोलणे सुरू केलें; व त्याच वेळी आपला भाऊ बडासाहेब यास मदुरा येथून स्वसैन्यानिश आपल्या मदतीस बोलावून घेतले. परंतु त्याच्या सैन्याचा मराठ्यांनी मार्गो- तच निकाल उडविल्यामुळे, चंदासाहेबाचा नाइलाज होऊन तो आपल्या वडील मुलासह मराठ्यांच्या स्वाधीन झाला ( ता० २६ मार्च इ. सन १७४१). तेव्हां मराठ्यांनी त्रिचनापल्लीचा किल्ला आपल्या ताब्यांत घेऊन चंदासाहेबाची व त्याच्या मुलाची सातारा येथे रवानगी करून दिली. त्या वेळेपासून इ. सन १७४८ पर्यंत तो व त्याचा मुलगा सातारा येथील किलपांत प्रतिबंधांत -होते. या वेढ्यांत मुरारराव घोरपडे यानें विशेष अंगमेहनत घेऊन चांगलेच कर्तृत्व व शौर्य प्रकट केले. म्हणून रघूजी भोंसले याने त्यास त्रिचनापल्लीचा सुभेदार नेमून तेथील सर्व व्यवस्था त्याच्याकडे सोपविली. तंजावरकर प्रतापसिंह याने या त्रिचनापल्लांच्या स्वारीमध्ये मराठ्यांना पुष्कळच साझ -केले. शिवाय फौजेच्या खर्चाबद्दल आठ लाख रुपये दिले. व शाहूस तीन लाख, त्याच्या राणीस दोन लाख, रघुजीभोसले व फत्तेसिंह भोंसले या उभयतोना दोन लाख, मिळून एकंदर इतर सात लाख रुपये नजर केले; म्हणजे एकंदर पंधरा लक्ष रुपये तंजावरकर प्रतापसिंहानें यावेळी मराठ्यांना दिले. उलटपक्षी चंदासाहेबासारखा बलिष्ठ व नाश करण्यास टपून बसलेला शत्रु कर्नाटक-