पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८० )

 व्यंकोजी हा स्वभावानें विशेष मानी असून, आपल्या वैभवाचा त्यास अतीशय अभिमान वाटत असे. त्याच्या आंग शौर्य व साहस या गुणांचा अगदर्दीच आभाव होता, असे दिसत नाही. उलट त्याने तंजावर येथें नुसती राजगादीच संस्थापित केली, इतकेच नाही तर त्रिचनापल्ली व मदुरा व राम- नाद, वगैरे ठिकाणच्या नायक राज्यकर्त्यांनाही त्याने आपल्या पराक्रमानें जागच्याजाग दाबून ठेविलें, आणि त्रिचनापल्लीकरांच्या मदतीस जाऊन त्यांच्याकडून सौंदल महाल मिळविला, यावरून तर तो पराक्रमी अथवा कर्तबगार राज्यकर्ता नव्हता, असें तर बिलकुलच म्हणतां येणार नाहीं. तथापि आपल्या राज्यांतील दूरचीं ठाण अथवा प्रदेश आपल्या ताब्यांत ठेवण्याइतकी त्याच्या पराक्रमाची अथवा कर्तबगारीची व्याप्ति नव्हती त्यामुळे म्हैसूरकडील दूरचा प्रदेश त्याच्या ताब्यांत राहणे अशक्य झालें, व त्यानें बंगळूर व बंगळूर प्रांत, फक्त तीन लक्ष रुपयांस म्हैसूरचा राज्यकर्ता चिक्कदेवराज यांस विकून टाकला ! शिवाय व्यंकोजांचा जन्म शहाचीप्रमाणेंच मुसलमान बादशाहीच्या सेवेत गेल्यामुळे, त्याला स्वातंत्र्याची व स्वाभिमा- नाची केव्हांही अखेरपर्यंत जाणीव झाली नव्हती. इतकेच नव्हे तर त्याचे सल्लागार व प्रधान मंत्री कित्येक मुसलमान असून त्यांच्या तंत्रानें तो नेहमी वागत होता. अर्थात् शिवाजीच्या स्वराज्य संस्थापनेंत तो त्यास मदतगार होईल, है केव्हांही शक्य नव्हते, हे उघड आहे.

 व्यंकोजीस दोन बायका होत्या; त्यापैकी वडील दिपाबाई ही इंग- ळ्यांची +ऋन्या. ही फार शहाणीव चतुर असून व्यंकोजीनें वैराग्यवृत्ति धारण


 + वन्हाडांत चिखली तालुक्यांतील अमडापूर परगण्यांत करखंड म्हणून एक गांव आहे. या करखंड वगैरे गावांचे देशमूख व मालक पाटील 'इंगळे' हे असून, जाधव, भोसले व इतर प्रसिद्ध मराठा सरदार घराण्याशी त्यांच्या सोयरिकी झालेल्या आहेत. तंजावरकर व्यंकोजी राजे याची बायको दिपाबाई ही इंगळ्यांची मुलगी. ते हेच इंगळे असें ते सांगतात. हैं घराणे व्यंको- जीच्या वेळेपासून आजतागायत तंजावर येथे असून त्यांना "राजे प्रतापरुद्र मानेराव " असा किताब आहे. ( काळेकृत वन्हाडचा इतिहास पहा.)