पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिशिष्ठ पहिलें.
तंजावरच्या राजघराण्याची
त्रोटक माहिती.

"शिवाजीनें जवांमदर्दीने नवें राज्य मेळविले आहे. तुझी आमची दौलत संपादिली आहे. त्यांत विठोजी राजे आमचे काका, यांचे कुटुंबांचें, व शरीफजी राजे आमचे भाऊ, यांचे वंशाचें, तुझी वडीलपणे चालवावें; आणि प्रजापालन करून राज्य करावें. वडील शिवाजी राजे यांनी सर्वांचे संगोपन करून चालवावें, तरी त्यांनी पृथ्वी आक्रमण करण्याचा इरादा धरिला, तेव्हां ईश्वर- कृपेनें त्यांचे मनोरथ पूर्ण झाले असतां, (ते) सर्वांचें संगोपन करावयास अधिकारीच आहेत करतील; कदाचित् त्याजवरी समय गुदरला तरी आह्मी पादशहा- पासून इतल्ला तोडून दौलतीचा बचाव करून घेतला आहे. ही दौलत तुम्हां उभयतांचीं; परंतु दौलत रक्षा- वयाकरितां तुम्ही वडीलपणे सांभाळ करावा. मुख्यार्थ आमचे कुळ आम्ही, आमचे कुटुंबांत शिवाजी राजे जेष्ठ; त्यांचे ठायीं तुम्ही; त्यास राजधर्म प्रवाहें तुम्ही वडीलपणे कुटुंबीयांचा सांभाळ करणे पराक्रमी शिवाजी राजांचे तुम्ही भाऊ, आमचे चिरंजीव, त्यांहून आवडते विशेष आहां; तरी सर्वापासून चांगले म्हणून ध्याल, पदरीं वडिलोपार्जित दोनचार माणसे आहेत, त्यांचे विचारें तुम्ही चालल्यास तुमचें कल्याण आहे."

शहाजीची, व्यकोजीस आशा.