पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७१ )

दरजाच्या श्रद्धेप्रमाणे, स्वातंत्र्याच्या यज्ञांत उडी घालून, आपले अंगीकृत कार्य तसेंच नेटानें पुढे चालवून, कर्नाटकमध्ये एक मांडलीकी स्वराज्य निर्माण केले, आणि आपल्या करामतीने महाराष्ट्रास एक नवीन दिशा दाख विली, हेंच शहाजीच्या चरित्रांतील श्रेष्ठत्व आहे, हे उघड आहे.

 वरील विवेचनावरून, शहाजीराजे यानें केवढाल प्रचंड कारस्थानें केलीं, जसजशी राजकीय परिस्थिति अधिक अधिक बिकट व खडतर होत गेली तसतसा तो अधिक अधिक उत्हासानें व चिकाटीने आपले अंगीकृत कार्य सारखा कसे करीत राहिला, मोंगल बादशहा व आदिलशहा यांच्या सारख्या प्रवळ सत्ताधा-यांश, प्रसंगी झगडून, त्यानें असामान्य असें राजकीय वैभव आपणांस करें प्राप्त करून घेतलें, वगैरे अनेक बाबतींची योग्य कल्पना होते. शहाजीचें चरित्र वाचून त्याचें मनन केल्यावर तो शिवाजीच्या खालोखाल असा एक अलोकिक मुत्पद्दि व वीर पुरुष निर्माण होऊन गेला, असे स्पष्ट पणे निदर्शनास येतें; आणि त्यामुळेच महाराष्ट्र देशाच्या राजकीय इतिहा- सांत शहाजीराजे यांस छत्रपति शिवाजी याच्या खालोखाल श्रेष्ठ स्थान निःसं- शय प्राप्त झालेले आहे, हे पूर्णपणे उघड होतें.