पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५८ )

शहानशाहा म्हणून किताब लावावा, आणि घरांत बोलतांना त्याच्याशीं ( राज्याची ) वांटणी करून बचलों आहों, अशी बरोबरीची भाषा वापरावी, असा दुटप्पी प्रकार शहाजीचा असे; आणि हा सर्व प्रकार आदिलशाहा, शहाजहान वगैरे लोकांच्या कानावर त्यांचे अखबरनवीस घालीत असत. परिणाम असा होई कीं, शहाजीसंबंधानें आदिलशाहा किंवा शहाजहान यांच्या मनांत सदा संशय वास करी. त्याच्यावर विश्वास कोणाचाच नसे. कामापुरता शहाजीला जवळ करावयाचा, आणि काम संपलें म्हणजे त्याला हाकून द्यावयाचा, असा प्रकार शहाजीच्या चरित्रांत कितीदा तरी घडला आहे. या दुटप्पी वर्तनानें जी मानखंडना होई ती शहाजीच्या आंग- वळणी पडलेली होती. स्वतःचा कार्यभाग कसा साधेल इतकेंच शहाजांचें पाहणें असे त्यांत मानखंडना होते, की मान- मंडणा होतें, ह्याचा कीस करीत बसण्यास त्याला अवकाश नव्हता; परंतु शिवाजी सारख्यांना ही धरसोड व तज्जन्य मानहानि बिलकूल खपत नसे." ( रा. मा. वि. चंपू पहा.) शहाजीनें मानहानीकारक अटी पत्करून, आदिलशाहाच्या प्रतिबंधांतून आपली मुक्तता करून घेतली, याबद्दल शिवाजीस अतिशय वाईट वाटलें; शहाजीच्या ह्या वागणुकीचा शिवाजीस अतिशय राग आला; व वडिलांचें धरसोडांचें धोरण व वर्तन त्यांनांच आजपर्यंत कसें नडत आलें, व त्याचा परिणाम वडिलांनाच कसा भोगावा लागला, यासंबंधी शिवाजीनें, आपला वृद्ध मुत्सद्दी सोनोपंत डबीर याच्याजवळ आपले मोठे मननीय विचार बोलून दाखविले; यासंबंधी बृहदी- श्वर शिलालेख पृष्ठ २४ मध्ये खालील मजकूर आहे तो:- " अपुले वडील शाहाजीराजे यांनी अल्ली यदलशाहा ( आदिलशाहा ) पासून मोकळीक होणेस्तव लाभले राज्य देखील सोडून सातारांस ( सातारा येथे ) येऊन राहिल्यावरी शिवाजीराजे पुरंदरगडांत होते, त्यांनी आपला मंत्री सुवर्ण नामक ब्राह्मण ( सोनोपंत डबीर) यांस बलाऊन येकांती सांगितले 'जे अमुचे वडील शाहाजीराजे परम शूर आणि योगवंतहि त्यांनी केली कार्मेदि निर्मल मनेंकरून केली. परंतु त्यांत थोडा भाव सुचतो. तो असा की, ते प्रथम निजामशाहाच्या संगतीस होते; ते अल्ली यदलशाहाचे बोलावण्यावरून त्यो