पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५७ )

अनुभवास आणून दिली. मुसलमानी राज्यकर्त्यांच्या अमलाखालील मनसब दारी, हें परतंत्र राष्ट्राच्या उन्नतीचे साधन नसून, त्या राजसत्तेला स्थिर व स्थाईक ठेवण्याकरतां, ती राजाश्रयाची लांच आहे, ही प्रधान गोष्ट शिवाजीनें ओळखली. राजाश्रय व स्वातंत्र्यप्राप्ती, ह्या दोन गोष्टी परस्पर अगर्दीच विरुद्ध आहेत; त्यापैकी पहिलीच्या आश्रयानें दुसरी केव्हांहि साध्य होत नाहीं, व दुसरी साध्य करण्याकरितां पाहिलीचा त्याग केल्याशिवाय ती मिळणे शक्य नाहीं, ही गोष्ट शिवाजीनें महाराष्ट्राच्या प्रत्ययास आणून दिली. परतंत्र राष्ट्रां- तील बहुजनसमाजाचा संसार नेहमींच परकीय जेते राज्यकर्त्यांच्या राजा श्रयावरच अवलंबून असतो; व तो तसा अवलंबून रहावा, अशीच राज्यपद्धति ते राज्यकर्ते नेहमी चालू ठेवितात. हा राजाश्रय पोटाला भाकरी देत असल्या- मुळे, संसारासाठी बहुजन समाजाला राजाश्रयाचा उपयोग करून घेतल्या- खेरीज गत्यंतरच नसतें; परंतु ज्या सत्तेमुळे जे त्यांच्या हातीं राजाश्रय गेला आहे, ती सत्ता मिळविण्यासाठी राजाश्रयावर अवलंबून राहण्याची जरूरी नाहीं, इतकेंच नाही तर राजश्रयावर अवलंबून राहिल्यास ती सत्ताहि मिळणे शक्य नाहीं, ही गोष्ट शिवाजीनें महाराष्ट्रास पूर्णपणे पटवून दिली. पण ह्यापैकी एकहि गोष्ट शहाजीच्या निजामशाहीच्या पायावर उभारलेल्या राज्यांत अथवा कर्नाटक मधील मांडलीकी राज्यांत घडणें शक्य नसल्यामुळे, राष्ट्रीयदृष्टथ शहाजांच्या प्रचंड उद्योगाला, शिवाजीच्या श्रेष्ठ कर्तृत्वाइतकें महत्व केव्हांहि देतांच येणार नाहीं, हे उघड आहे. शहाजी व शिवाजी या उभयतांच्या वर्तनातहि अतिशयच विरोध आहे. शहाजी प्रसंगाला अनुरूप असें घरसोडांचें धोरण व वागणूक ठेवीत असे. त्यामुळे त्याच्या वर्तनांत नेहमींच विसंगतता होत असे, व या दुटप्पी वर्त- नामुळेच त्याची मानखंडनाहि होत असे; " स्वतःच्या दरबारांत यव- नांची किंचित् कुचेष्टा झालेली शहाजीला खपत असे. बाहेर कागदोपत्री शहाजी आदिलशाहाला आपला अधिराज म्हणून अदबीनें संबोधी आणि घरी दरबारांत त्याचे कवी शहाजीनें आदिलशाद्दाचें राज्य राखिलें आहे, म्हणून शहाजीची प्रौढी गात. बाहेर बोलावयाचे झालें म्हणजे शहाजहानला
१७