पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५५ )

असते; व ती दृढमूल झाली, व पायरी पायरीनें पराकाष्ठेपर्यंत वाढत गेली, ह्मणजे तिलाच वीरवृत्तांचे स्वरूप प्राप्त होते; ही वीरवृत्ति कायम टिकविण्या करितां, राष्ट्रीय चळवळीत यशाचा आधार असलेली श्रद्धा डळमळित होऊं नये, यासंबंधों पूर्ण खबरदारी घेण्यासाठी, निःस्वार्थी, व सर्वस्व नाशाचीहि क्षिती न बाळगणाऱ्या श्रेष्ठ विभूतीच्या हार्तीि राष्ट्राचे सूत्रचालकत्व असावें लागतें; ती विभूती आपल्या कर्तबगारीनें राष्ट्रांत विश्वास व श्रद्धा उत्पन्न करिते; ह्याच विश्वासामुळे, व श्रद्धेमुळे, रणांगणावर प्रत्यक्ष मरणास तयार होणारें सैन्य निर्माण होतें; व त्याबरोबरच ती राष्ट्रीय विभूती, एक दिवा जसा दुसन्या दिव्यास पेटवितो त्याप्रमाणे, एकाच्या अंतःकरणांत पेटलेली वीरवृत्तीची ज्योत दुसऱ्याच्या अंतःकरणांतील वीरवृत्तीला पेटविण्याचे कार्य राष्ट्रभर करीत राहते. अशी स्थिति प्राप्त झाली ह्मणजे एका बाजूनें राज्यकर्ते जित लोकांवरील आपली सत्ता कायम रहावी ह्मणून, व दुसन्याबाजूनें वांरवृत्तीच्या पायरीला पोचलेले जितलोक, जे त्यांचा आपणावरील अंमल झुगारून द्यावा ह्मणून उभयतांमध्ये तीव्रप्रमाणावरील झगड्यास प्रारंभ होतो; आणि राज्यकर्त्यांच्या मानानें, असह्य संकरें, अनिवार्य अडचणी, अननुभवित हाल आपत्ती, व अगम्य कारस्थानें यांनां तोंड देण्याचा मोठाच दुःखाचा व सर्व नाशाचा प्रसंग जित लोकांवर, येऊन कोसळतो. अशावेळी, विवेकानें, एकोप्यानें, एकतानतेनें, देशभक्तीच्या श्रद्धेनें, भावीकाळांत जिवंतपणाची सुर्खे राष्ट्रास लाभावी या इच्छेनें, पुढील कार्यावर दृष्टी देऊन जर त्या प्रसंगाला मोठ्या हिंमतीने तोंड दिले तर ह्या दुःखाच्या व सर्व नाशाच्या प्रसंगांतूनच जित लोकांत स्वराज्य प्राप्त करून घेण्याची लायकी उत्पन्न होते, व ते स्वराज्य प्राप्तीला पात्र ठरतात. ही पात्रता शहाजीच्या राज्यसंस्थापनेनें माहाराष्ट्रांत उत्पन्न झाली नसती, ब नव्हती; ती पात्रता शिवाजीनें आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्राच्या आंगी आहे असे भावीकाळांत सिद्ध केले. म्हणून शिवाजीच्या कर्तृत्वाला शहाजीच्या कर्तबगारीच्या मानानें श्रेष्ठस्थान दिले पाहिजे, हे निर्विवाद आहे. शिवाजीनें केलेल्या स्वराज्य संस्थापनेची श्रेष्ठता व त्यासाठी त्याने केलेला कन्पनातीत स्वार्थत्याग, यांची थोरवी वर्णन करावी, तेवढी थोडीच आहे; जित राष्ट्रांतील रंजले गांजलेले लोक सुद्धां, सर्व नाशाचा प्रसंग उत्पन्न झाल्या-