पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २५४ )

अमलाखालील पारतंत्र्यदुःखांत खितपत पडलेला होता; हें सतत तीनशे वर्षे महाराष्ट्राच्या कपाळी एकसारखें जडलेले दुःख सोशोत असतांना उत्क र्षांचा काळ उत्पन्न करण्यास, व तो परिपक्क झाला असतां त्या काळाचा पूर्ण फायदा घेण्यास, राष्ट्राच्या उपयोगी पडेल असें, शरिराला, मनाला व बुद्धीला लावण्याचे महत्वाचे कार्य शहाजांच्या, त्याने स्थापन केलेल्या अथवा निजाम- शाही पायावर उभारलेल्या राज्याकडून झाले नसते; व महाराष्ट्रास आत्म- यशाचा व राष्ट्रीय कार्याचा धडादि मिळाला नसता. शहाजीच्या राज्यांत, गरीब मराठे व हिंदु समाजाचे पोट कसे भरेल, हा प्रश्न थोड्याफार प्रमा णीत सुटला असता; व कित्येक ब्राह्मण, मराठे, व हिंदु कुटुंबाच्या पोटा- पाण्याची तजवीज झाली असती; कांहों दीनदुबळ्यांच्या हालअपेष्टा नाहीशा झाल्या असत्या; कांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांचा दुःखभार हलका करण्यांत आला असता; म्हणजे व्यक्तिविषयक सुखाच्या सवलती, मुसलमानी राज्यांच्या मानानें शहाजीच्या राज्यांत अधिक प्रमाणांत लाभल्या असत्या; पण राष्ट्रीय दृष्टया त्या गौण स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांचे महत्वहि तित- पतच होतें. कोणत्याहि राष्ट्रांतील लोकांचा संसारांतील आनंद, धर्म व राज- सत्ता ह्या दोन प्रधान गोष्टीवर अवलंबून असतो; लोकांच्या मनाचें समाधान धर्मावर व पोटाचे समाधान राजसत्तेवर अवलंबून असतें; त्यामुळे ह्या दोन गोष्टीवर घाला आला म्हणजे राष्ट्र परतंत्र होऊन त्याचा संसार दुःखपरंपरचा बनतो; पण ही दुःखपरंपरा विलयाला जाऊन महाराष्ट्राचा संसार सुखाचा होण्याला शदाजीच्या राज्याचा कांहींहि उपयोग झाला नसता; अथवा त्यामुळे स्वराज्य संस्थापनेला आघारभूत असलेली वीरवृत्ति, किंवा प्रतिकाराची तीव्र बुद्धि अथवा जाणीव, महाराष्ट्रांत उत्पन्न झाली नसती. ही वीरवृत्ति, ही वुद्धि अथवा जाणीव महाराष्ट्रांत शिवाजीने उत्पन्न केली. स्वराज्य मिळविण्याच्या राष्ट्रीय चळवळीचा मुख्य पाया निःस्वार्थाच्या श्रद्धेवर, व सर्वस्व नाशाच्या तयारीवर उभारावा लागतो; व या तयारीबरोबरच राष्ट्रांत प्रतिकाराची प्रवृत्ति उत्पन्न करून, व तिला संघटित व व्यवस्थित स्वरूप देऊन, स्वराज्याला उद्देशून आत्मयज्ञ करण्याची संवय लावावी लागते. प्रसंगार्ने मनुष्याच्या अंतःकरणांतील प्रतिकाराची प्रवृत्ती, उचंबळून वर येत