पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३५ )

या शब्दाच्या खन्या व्याख्येप्रमाणे शहाजीनें कर्नाटकांत कानडी लोकांवर स्थापन केलेले स्वराज्य हें खरें स्वराज्य नसून शिवाजीनें महाराष्ट्रांत स्थापन केलेले स्वराज्य तेच खरें स्वराज्य होतें, असें म्हणणें प्राप्त होतें.

 शहाजीनें स्वराज्यस्थापनेकरितां - निजामशाही जगविण्याकरितां जे प्रचंड उद्योग केले, त्यांत त्याची पूर्णपणे फसगत झाल्यानंतर, अगदी नाइलाजानें, व मोठ्या दुःखानें तो विजापूरकरांच्या नोकरीत राहेिला. "विजापूरकरांच्या चाकरीत शिरल्यानंतर पहिल्या तीनचार वर्षांत शहाजीच्या मनोवृत्तीत जो क्षोभ उत्पन्न झाला, त्यांतच शिवाजीच्या राज्यस्थापनेचें बीज आहे. राज्य- संस्थापकाच्या पदवीस पोहोंचलेल्या शहाजीस है परमुलुखांत सेवावृत्तीचें लाजिरवाणें जिणे पतकरणे कशामुळे प्राप्त झाले १ मोंगलांच्या नांवानें तो ( शहाजी ) जळत होताच; पण विजापूरकरांनी आयत्या वेळी आपणांस दगा देऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेतला याबद्दल त्याचें मन फार दुखाव होतें. ' महंमद आदिलशाहार्ने विश्वासघात करून माझे राज्य बुडविलें, आणि जहागीर दिल्याचा उपकार दाखवून मला हद्दपारीची शिक्षा भोगा- वयास लाविलें; ज्यांच्या मांडीस मांडी लावून बसण्याची योग्यता आपण संपादन केली होती, त्यांचीच आतां ताबेदारी सोसावी, चाकरी करावी, मजी धरावी, असे दिवस आपणाला प्राप्त झाले आणि इतकें असून श्याबद्दल तोंडातून अक्षरहि काढण्याची सोय नाहीं, हा गुपित मारा निमूट पर्णे यावज्जीव सोसलाच पाहिजे.' असे विचार उद्भवून त्याच्या मनास अतीशय खेद वाटत असे; 'ज्यांनी हे सर्व केले, त्या शत्रूवर भगर हित- शत्रूवर सूड उगविण्याच्या संधि आतो माझ्या आयुष्यांतून निघून गेल्या असे दुःखद् विचार त्याच्या मनांत नेहमी येत असत. " ( खरे-मालोजी व शहाजी हा निबंध पहा; ) ही सर्व गोष्ट खरी, पण आदिलशाही सत्तेशीं, नाइलाजानें का असेना, पण सहकरिता पत्करून मांडलीकी स्वराज्य स्थापन करण्याच्या आशेचा लोभ, तज्जन्य आसक्ति त्याला जडल्याबरोबर त्याच्या मनांत आपल्या हितशत्रूबद्दल सूडाच्या भावना जागृत असूनहि श्या दाबून ठेवाव्या लागल्या. निदान वरकरणी तरी त्याला आपली राजनिष्ठा दाखवीत रहावे लागलें; इतकेच नव्हें तर बलिष्ठार्शी केलेल्या अतिप्रसंगाचे प्रायश्चित्त