पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३३)


ठेवावयाचें, राज्यकर्त्याच्या मर्जीचा कल, व राजकीय परिस्थितीचा ओघ पाहून कालप्रसंगानुसार त्या वैभवाची वृद्धी करावयाची, आणि राज्यकर्त्याची कृपादृष्टी नेहमीं कायम राहून तें वैभव आपणांस व आपल्या भावी पिढीस लाभत रहावें, म्हणून नेहर्मी प्रयत्न करीत रहावयाचें, हैच शहाजीच्या उत्तरचरित्रांत त्याचें मुख्य ध्येय होऊन बसलें. " स्वतंत्र स्वराज्याचें पक्क फळ आपण केलेल्या धक्काबुकीने यवनी सत्तेच्या वृक्षापासून तुटून अलगत आपल्या पदरांत पडेल " ह्या शहाजीच्या अटकळीचा बोजवारा उडाल्या- बरोबर, मांडलीकी राज्याचें कच्चें फळ तरी राजनिष्ठेनें राहून, आपल्या पदरांत पाडून घ्या, अशी त्याची मनोवृत्ती बनली, व राजनिष्ठेच्या भारानें, च राजकीय परिस्थितीच्या योगायोगानें तें फळ यवनी सत्तेच्या वृक्षापासून अलगत तुटून शहाजीच्या पदरांत पडल्याबरोबर राजनिष्ठेचें आचरण, व राज्यकर्त्यांच्या कृपेचें आच्छादन या दोन भरभकम व निर्भय आधारावर आपल्या मांडलीकी संस्थानाची जेवढी भव्य इमारत उभारता येईल तेवढी उभारावयाची, एवढेच एक विशिष्ठ ध्येय शहाजीच्या उत्तरचरित्नांत अखेरीस कायम राहेिलें.

 शहाजीनें " स्वराज्याचें समग्र नाटक लिहून ठेविलें होतें; इतकेंच नव्हे तर त्याची रंगित तालीमही त्याने करून पाहिली होती; फक्त त्या नाटकाचा महाराष्ट्राच्या रंगभूमीवर जाहीर प्रयोग व्हावयाचा होता; तो ( पुढे ) शिवाजीनें उत्कृष्ठपणें वठवून दाखविला. अहंमदनगर, विजापूर व दिल्ली, येथील राजवर्टातून रुळलेल्या शहाजीस मुसलमानी दरबाराची खडान्खडा माहिती होती; करोल सैन्य होतें; अकलेस मूर्त स्वरूप देणारें शौर्य होतें, > आणि हरएक व्यक्तीस ताब्यांत ठेवण्याचे कसब होतें. महाराष्ट्र भजन पूजनांत दंग असतां शेकडों भजनी मंडळ्या व संतमंडळ्या, यांच्या टकळीनें जें महत्कार्य घडून येणारें नव्हतें, त्याची गुप्त तयारी मुसलमानांच्या पदरी राहून शहाजीनें चालविली होती; स्वराज्याचा डोलारा शहाजीने तयार करून ठेविला होता; फक्त त्याचा अनावरण समारंभ शिवाजीच्या हांतून घडाव- याचा होता. " परंतु शहाजीनें तयार केलेला स्वराज्याचा डोलारा, हा मांडलीकी स्वरूपाचा असल्यानें, त्या स्वराज्यांत व्यंगें होतीं; त्यांत "मांड-