पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३२ )

करणे, हेच आपल्या आयुष्यांतील इतिकर्तव्य आहे, असे त्यांस वाटू लागले. सहकारितेमुळे प्राप्त झालेल्या वैभवांत शिरजोर झालेल्या शहाजीस दर्मात उखडून टाकल्यावर त्याच्या पूर्वीच्या तेजस्वीं मनोवृत्ति पुष्कळच प्रमाणांत थंड झाल्या; आणि शहाजीचे डोईजड झालेलें लष्करी बळ खच्ची केल्यानंतर, मुसलमानी सत्ताधाऱ्यांना जो निर्धास्तपणा वाटला, त्याच निर्धास्तपणाच्या सुखांत, आणि सेवावृत्ती पत्करल्या नंतरच्या मेहेरबानीमुळे शहाजीला कर्ना- टकांत एक मांडलीक राज्य स्थापन करती आलें. पण या परावलंबी स्थिती- मुळे, त्याला आपल्या मनोवृत्तीही परावलंबी ठेवाव्या लागल्या; म्हणजे स्वतःच्या मनोवृत्ती व महत्वकांक्षा यांना मर्यादित क्षेत्रांतच डांबून ठेवण्याच्या इच्छेबरोबरच पूर्वीचा सर्वच आयुष्यक्रम त्यास मर्यादित करावा लागला, आणि आदिलशाहाशीं सख्यत्वानें राहून त्याच्या नांवावर, राजनिष्ठेच्या आश्र यानें कर्नाटकांत एक लहानसें मांडलीक राज्य निर्माण करून त्यावरच शहाजीस आपली स्वराज्याची महत्वाकांक्षा अखेरीस भागवून घ्यावी लागली.
 शहाजीच्या स्वराज्य संस्थापनेच्या प्रयत्नांस दोनदांही अपयश आल्यामुळे आणि त्यामुळेच शहाजीची महत्वाकांक्षा झपाट्यानें कच खाऊन मागें फिरल्यानंतर लागलीच त्याच्या ठिकाण आशेचा लोभ उत्पन्न झाला; शहाजीच्या हांतून अग्रपूजेचा मान हिसकावून घेण्याकरितां, त्याला दमत उखडून टाकण्याच्या कारस्थानांत, अदिलशहाचे प्रत्यक्षपणें कान पिरगळून, आणि लांचाची लालूच दाखवून त्याला आपल्या पक्षांत मिळवून घेऊन, निजाम- शाही राज्यक्ष्मीची वांटणी करून घेण्याचा शहाजहान याचा डॉव ज्या घटकेस सफळ झाला, त्याच वेळीं शहाजीच्या विचारसरणींत व वर्तनक्रमांत एकदम फरक पडला; पूर्वीचे ध्येय बदलून " राजाश्रयाच्या प्राप्तीतील भागी- दारी " हे त्याचें विशिष्ट ध्येय बनले. मानभंगाचे दुःख तो विसरला नाहीं; आपल्या तेजस्वी मनोवृत्ति ठेंचून टाकणाच्या दुष्मनांची आठवण तो विसरला नाहीं; पण दर्मात उखडला गेल्यामुळे, आशेचा लोभद्दी त्याला सोडत आला नाहीं. आणि “ कमविलें तें टिकलें, व टिकविले म्हणजे मिळविली " अशी, अपयशामुळे उत्पन्न झालेल्या निराशेनंतर, त्याची मनोवृत्ती बनली; तिचा परिपोष होत गेला; आणि सेवाधर्मामुळे प्राप्त झालेले वैभव कायम