पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१९ )

 "शहाजी व शिवाजी " या निबंधरूपों लेखांत, एके ठिकाण (ता. २४ एप्रील इ० सन १९२३च्या केसरा मधील अग्रलेख पहा.) मोठें मननीय विवे चन केले आहे ते असे आहे कीं, “श्रीशिवाजी महाराजानी महाराष्ट्रांत स्वराज्य संस्थापना कशी केली, त्यांच्या ह्या अलौकिक कर्तबगारीस भूतकालीन वा समकालीन अशा कोणत्या व्यक्तीचे प्रयत्न साहाय्यभूत झाले, आणि श्री शिवाजो महाराजाचें लहानपणांपासून धोरण काय होते, याविषयी इतिहासकारात अद्यापि एकमत नाहीं. तथापि प्रसिद्ध इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांचा " मालोजी व शहाजी " हा निबंध आणि " राधा-माधव विलास चंपू " या काव्याची प्रसिद्ध करितांना राजवाडे यांनी त्या ग्रंथ स जोडिलेली प्रस्तावना, यांच्या योगानें या विषयावर बराच प्रकाश पडला आहे. " राधा- माधव विलास चंपू " हे काव्य शहाजीच्या चरित्रावर रचिले असल्यानें श्याच्या प्रस्तावनेत मुख्यतः शहाजीचेच घोरण, ध्येय, व साधनें यांचा विस्तारशः उहापोह करण्यांत आला आहे; आणि "शहाजीचा प्रयत्न को फसला ? " याची मिमांसा करितांना, शहाजी व शिवाजी यांच्या धोरणाची व साधनांची तुलना करणे भाग पडल्यामुळे, राजवाडे यांच्या प्रस्तावनेचा एकांगीपणा नाहींसा होऊन ती सर्वांग पूर्ण बनली आहे. "

 " पारतंत्र्याची शृंखला महाराष्ट्राच्या पायांत ठोकली गेल्यानंतर ती तोडून टाकण्याविषयी किंवा निदान तज्जन्य वेदना सह्य होतील, असें कर- ण्याविषयों शहाजीच्या पूर्वी कसकसे प्रयत्न करण्यांत आले, व ते का विफल झाले, याचें मार्मिक वर्णन राजवाडे यांनी एके ठिकांणों केलें आहे; ते लिहि- तातः-“हाजीच्या आध, व त्या काली राष्ट्र सुधारणेचे प्रयत्न करणारे शेख महंमद काही थांडे थोडके झाले नव्हते. विठोबा सर्व कांही योग्य वेळी नीट करील, असे समाधान मानून घेणारे भक्तिमार्गी तर असंख्य होते. मुश्लमानी पेहराव, चालीरीति, धर्म, भाष' स्वं कारून समाजाच्या यातना बंद करूं पाह- णारे कितीतरी हिंदू प्रांतोप्राती पीर होऊन बसले होते. यवनावर रुसून त्यांच्य. शीं व्यवहार बंद करून त्याचे मुखावलोकनहि न करणारी दासोपंतादि मंडळी आपल्याकडून यवनांच्या पारिपत्याचे प्रयत्न करीतच होती. यवनाविरुद्ध बंड करून स्वराज्य मिळविणारहि काही वेडे निपजले. यवन सेवा करून जन-