पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१८ )

रामोत्पन्न आलस्यामुळे दौर्बल्य निर्माण झाल्यासही त्यांच्याहून श्रेष्ठतर निदान त्यांच्याबरोबरांची हत्यारें, जित लोकांनी पैदा केल्याशिवाय, त्यांचा पाडाव होणे अशक्य आहे.

 " हत्यार चोख पाहिजे, आणि ते प्रतिपक्षाच्या हत्यारांहून श्रेष्ठतर पाहिजे; या बाबीची जाणीव शहाजीच्या ठायीं स्वकालीन अनुभवानें अभ्युत्कट बाणलेली होती;...एवढो मोंगलांची अफाट व प्रबळ सत्ता; परंतु पोर्तुगीज चाच्यांनी कितीदा तरी समुद्रावर त्यांची इज्जत घेतली; ह्याचकाली कस्तुंतुनि- याच्या तुर्की|र्नी व्हेनांशियन लोकांपासून श्रेष्ठ बंदुका व तोफा आणि दारूगोळा तयार करण्याची सर्वश्रेष्ठ कला अर्धमुर्धी व उष्टीमाष्टी किंचित आपलीशी केली होती; त्या अधवट तुर्क कारागिरांनां पदरी ठेवून दिल्लांचा मोंगल व दक्षिणेतील शद्दा, हत्यारें व दारुगोळा बनपुन त्याच्या जोरावर देशांतील अर्धवट सुधारलेल्या टाळकुट्या हिंदूंना व परस्परांन भिवडवीत असत. हा सर्व चमत्कार शहाजी पहात होता. उत्तम कारागिर हत्यार कोठून पैदा होते, व कोण आणून देतो, ह्याचा अनुभव जुन्नरच्या घाटाखालील कोकणांत त्याला आला होता. दमण, दांव, वसई, गोवा, सुरत, तेलीचरी, इत्यादि स्थलीच्या टोपीवाल्यांकडून कारागीर हत्यारें पैदा करून निजामशाही, अदिलशाहां, व मोगलाई सैन्याहून शहाजी आपली फौज जास्त कर्तबगार ठेवू लागला. अशा तऱ्हेनें पक्ष, सैन्य, व इस्वार, शहाजान निर्माण केले; आणि त्यांच्या जोरावर प्रकट स्वराज्य, प्रच्छन्न स्वराज्य, मांडलीक स्वराज्य व निर्मळ स्वतंत्र स्वराज्य, उत्तरोत्तर स्थापित असतां वेळोवेळी येणाऱ्या विपत्तीत दम न खोडितां पूर्वीच्याहून जास्त हुरुपानें पुढील कर्तव्य तो बजावत राहिला. सैन्य व हत्यार यांच्यावरील त्याचा विश्वास मोठ्या विस्ततही कधी ओसरला नाही. शेवटी या साधनांच्या जोरावर आपण विजयी होऊंच होऊं, अशी त्याची बालंबाल खाधी होती; व परिणामावरून पाहतां ही खाल्ली साधार होती. शहाजीच्या अलौ- किक निर्ध राची व दमाची ही अशी मिमांसा आहे. "

 शहाजी हा अशा प्रकारच्या निर्धाराचा, निधड्या छातीचा; - दमदार, अतीशय पराक्रमी, फार शूर, पटाइत सेनानी, कसलला मुत्सद्दी असूनसुद्धां त्याच्या हृांतून स्वराज्य संस्थापनेचे कार्य का घडून आले नाही, यासंबंधो