पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१४ )

दित महत्वाकांक्षा शहाजीची असावी, यांत संदेह दिसत नाही. त्याच मह- त्वाकांक्षेशिवाजीने साकार व साक्षात् राष्ट्रीय स्वरूप आणून दिले. म्हणून शिवाजीला जर आपण मराठशाहीचा " " संस्थापक " म्हटलें तर शहाजीला मराउशाहांचा " संकल्पक " असे म्हणण्यास हरकत नाहीं. शहाजीची खरी योग्यता व कर्तबगारी अद्यापि बाहेर आलेली नाहीं; तथापि शहाजीच्या एकंदर आयुष्यक्रमावरूनसुद्धा जरी शहाजीचे उत्तर चरित्र फारसे उपलब्ध नाही तरी, शिवाजीप्रमाणेंच, पण त्याच्या खालोखाल शद्दाजीही स्वराज्यनिर्माणकर्ता, व महाराष्ट्र स्वातंत्र्याचा उत्पादक होता है. कोणासही अवश्यमेव कबूल करावे लागेल. "

 शहाजीच्या ह्या प्रचंड उद्योगापासून शिवाजीस त्याच्या स्वराज्य संस्था- पर्नेत व वृद्धांतही अनेक फायदे झाले. शहाजीनें निजामशाही " आपली " या भावनेने ती जगविण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला; म्हणून शिवाजी स्वतः " आपण निजामशाही राज्याचे वारस आहोत; " मॉगल अथवा अदिलशहा हे नाहीत, असे समजत असे. ( मालोजी व शहाजी हा निबंध पहा). " प्रथम प्रथम शिवाजीला बोभाटा न करिता, व फारसें वर्दळीवर न येतां पुण्याच्या आसपासच्या प्रदेशांत आपला अंमल कसा बसवितां आला, याची उपपत्ति लाविताना त्या प्रदेशांत नुकतीच घडून आलेली राज्यक्रांति अवश्य लक्षात घेतली पाहिजे. निजामशाहा व अदिलशाही यांमध्ये निरानदीची सर इद्द होती. निरे पासून चाकण पर्यंतचा मुलूख निजामशाहीपैकी असून तेथे शहाजीचा अंमल होता; व तो लोकप्रिय होता. अलांकडे झालेल्या बांटत हा मुलूख विजापूरकराकडे गेला होता. तथापि त्यांचा तेथील बंदोबस्त ढिलाच होता. शहाजीचा अंमल उठून पांच चार वर्षे होतात न होतात तोच तेथील लोकांच्या कानावर शिवाजीचे नांव वारंवार येऊं लागले. तो काय करितो, व करणार काय इकडे सर्वांची कौतुक. पूर्ण दृष्टि वळली. या मुलाचे बरें व्हावें, याचा मनोदय सिद्धीस जवा, याला शक्य ती मदत करावा, इकडे लोकांच्या मनाची प्रवृत्त होऊं लागली. निरेच्या अलीकडील प्रदेश शिवाजीला सहजा- सहजी मिळविता आला याचें खरें कारण हेच होय. सिंहगड, पुरंदर, तोरणा, लोहगड, राजमाची, वगैरे मोठमोठे किल्ले या टापूंत आहेत; परंतु यातील एक ह