पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१३ )

उदयासंबंधी विचार करितांना शहाजीच्या ह्या उच्च स्थितीचाही अंदाज करून घेणे अगत्याचे आहे. ( राजवाडे, खंड ४ ). सारांश, महाराष्ट्र देशति स्वतंत्र राज्यस्थापन करण्याचे काम जरी शिवाजीच्या हांतून तडीस गेले, तरी त्या कामाची शक्यता व तयारी ह्रीं शहाजीच्या हांतूनच घडली होती. प्रत्यक्ष शहाजीला स्वातंत्र्य नको होते असे नाही. स्वतंत्र होणें देश कार्यासाठीं जरूर आहे, प्रयत्न केल्यास ते साध्य आहे, व तें तडीस नेण्याची शक्ति आणि धमक आपणांस आहे, हे सिद्धात शहाजीच्याच मनाने ठरविलेले असून त्याजपासून ते शिवाजीनें उचलिले. मात्र ते सिद्धांत स्वतः अमलांत आणण्याची प्रत्यक्ष खटपट शहाजीनें आरण होऊन केली नाहीं. मुसलमानी अमलाखालीं तो वाढला असल्यामुळे उघडपणे बंड करणे त्यास योग्य वाटले नाहीं. कदाचित् तसे त्याने केले असते तर इच्छित कार्य तडीस गेलें नसरें. एकदम बंडखोर म्हणून अदिलशाद्दशी उघड युद्ध करण्यांत स्व- शक्तीचा व्यय त्यास करावा लागला असता. परंतु शिवाजीच्या कृत्यांस त्याची आंतून संमति असली पाहिजे असे वाटतें, स्वतःची धोरणे जाणणारौं कित्येक योग्य मंडळी त्याने शिवाजांच्या मदतीस दिली. दहा वर्षेपर्यंत शिवाजी जे उद्योग करीत होता, ते शहाजीस समजत होतें; आणि त्याची तशी संमती नसती तर मुलाचा बंदोबस्त करण्याचे कांहीतरी प्रयत्न त्याने केले असते. कैदेत पडल्यावरही आपल्या सुटकेकरितां त्यागे शिवाजीस आपले उद्योग बंद करण्यास सांगितलें नाहीं; ( उलट कान्होजी जेध्यापासून शिवाजीस मदत करण्याबद्दल शपथ घेवविली; ) आणि कर्नाटकांत तर त्याने उघड उघड स्वातंत्र धारण केले होते. अर्थात् शिवाजानें महाराष्ट्रांत व व्यंकोजीनें कर्ना- टकांत स्वतंत्रपणे राज्य करून लौकिक मिळवावा, अशी त्याची इच्छा असलो पाहिजे. मात्र मुसलमानशाही बुडून नर्मदेपासून कन्याकुमारीपर्यंत मराठ्यांचें एकछत्री स्वतंत्र राज्यस्थापन व्हावे, इतकी शिवाजीची धांव शहाजीच्या मनांत नव्हती. ह्यास पूर्वपरंपरा व वयोमान हेही कारण आहे. ज्या गोष्टी करण्यास शहाजी कचरत असे, त्या पुष्कळी शिवाजीनें बेलाशक तडीस नेल्या; परंतु मराठ्यांचें मर्यादित राज्य उत्पन्न होऊन, आपल्या लोकांचें, व व आपल्या कुलाचें आजपर्यंतचे नष्टवर्य संपून भाग्योदय व्हावा अशी मर्या-