पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शहाजी राजे
मालोजी राज भोंसल, वेरूळकर;
पत्नि, निंबाळकर घराण्यांतील, नामें दिपाबाई
I
शहाजी राजे,

 जन्म, इ० सन १५९४ मध्ये; इ० सन १६०६ पासून मालोजी राजे याच्या हातांखाली राजकीय शिक्षण मिळण्यास सुरवात; मालो- जीच्या मृत्यूनंतर त्याची सर्व जहागीर व सैन्य यांचे आधिपत्य शके १५४३ दुर्मति संवत्सरी, ( इ० सन १६२१ मध्यें) शहाजीस प्राप्त झालें; ( बृहदीश्वर शिलालेख ). दोन लमें झाली; पहिली स्त्री ना जिजाबाई; लुकजी जाधवराव शिंदखेडकर याची कन्या; (जन्म, इ० सन १५९५; ) लग्न इ० सन १६०४ च्या एप्रील महिन्यांत; तिचे पोर्टी पुत्र दोन; नामें संभाजी व शिवाजी; संभाजी, जन्म इ० सन १६२३मध्ये, दौलताबाद येथें; मृत्यू इ० सन १६५३ मध्ये कनक- गिरी येथील वेढ्यांत; दुसरा पुत्र शिवाजी मराठा साम्राज्य संस्था- पक; छत्रपति; जन्म शालिवाहन शक १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुद्ध पंचमी रोहिणी नक्षत्र, सोमवार, त्या दिवशी उत्तर रात्री, ( ता० १० एप्रील इ० सन १६२७ ) जुन्नर जवळील शिवनेरी किल्लयांत; मृत्यू; शके १६०२, चैत्र शुद्ध १५ रविवार, ( ता० ५ एप्रील इ० सन १६८० ) रायगडावर; जिजाबाई ही, शिवाजीचा राज्याभिषेक स्वनेगांनी अवलोकन केल्यानंतर बारा दिवसांनी जेष्ठ वद्य नवमी, शके १५९६, ( ता० १८ जून इ० सन १६७४ रोजी ) रायगडाच्या पायथ्याखाली असलेल्या पांचाड या खेडेगांवी मृत्यू

[ वंशावळ पुढे चालूं ]