पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २०२ )

राज्यांची भर केली होती; जन्मापासून मुसलमानी अमलाच्या वातावरणांत सारखा वाढत गेल्यानें मुसलमानी धर्म व समाज यांच्याबद्दल त्याच्या मनांत वैषम्य अथवा वैरभाव नव्हता. निजामशाही व अदिलशाही राजघराण्यांवर त्याची विशेष्य भक्तो होती; तो व त्याचा भाऊ शरी- फजी या उभयतांचीं ह्रीं नांवें पिराच्या नांवावरून ठेविलेली होती. इ० सन १६५६ मध्ये महंमद अदिलशहा मृत्यू पावला त्यावेळी शहाजीनें मुसलमानांचे अशौचविधी मनापासून पाळिले होते. सारांश, शहाजी स्वराज्याचा संकल्पक होता, तरी तो स्वतंत्र स्वराज्याचा संस्थापक नव्हता. मुसलमानी राज्य- वृक्षाच्या छायेंतील स्वराज्याचा तो संकल्पक व संस्थापक होता; आणि जरी इ० सन १६२६ पासून इ० सन १६३६ पर्यंतच्या दहा वर्षांत त्यानें निजामशहाच्या नांवाने कारभार चालविला तरी वस्तुतः त्यावेळी मुसलमानी राज्यवृक्षाच्या छायेतील ते एक स्वराज्यच असून शहाजी हाच निजामशाहीचा पूर्ण स्वतंत्रपणे कारभार चालवीत होता. शहाजीनें राज्य संस्थापनेचा प्रयोग केला; पण तो वरील स्वरूपाचा होता; त्यांत व्यापक दृष्टी, अथवा राष्ट्रीय विस्तृत कल्पना, यांचा अभाव होता. व हीच उणीव पुढे शिवाजीनें भरून काढिली.

 तथापि शहाजीनें आपल्या प्रचंड उद्योगानें दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रत्ययास आणून दिल्या; त्यापैकी पहिली ही कीं, हातीं मुब लक द्रव्य असल्यावर देशांतील लढवय्ये लोक नौकरीस ठेवून त्यांच्या मद- तीनें हिंदुस्थानांत राज्यस्थापन करणे शक्य आहे, हा जो मोठा शोध पुढे शंभर वर्षांनी फ्रेंच सरदार डुले यानें जगाच्या निदर्शनास आणिला, तो शहाजीनें स्वतः अगोदरच प्रत्यक्ष अमलांत आणिला; आणि दुसरी गोष्ट ही की, जरी जवळ तोफा व पायदळ नसले तरी गनिमी काव्याच्या युद्धाचें पूर्ण ज्ञान असल्यास गनिमी काव्याने शत्रूची रसद मारून, कही काबाड लुट्न व शत्रूचा मुलूख लुटून जाळून व गनिमी युद्धानें अचानक छापे घालून शत्रुसैन्याची मनुष्य- हानी करून; व त्याला सारखें मंडवून सोडून- शत्रूच्या दुप्पट फौजेसही हैराण करून तिचें अतीशय नुकसान करितां येतें, द प्रसंगी तिची धूळधा- घाणही उडविता येते, आणि स्वतंत्र व निव्वळ मराठी (बिन शिकलेली ) [ पुढील मजकूर २०७ पृष्ठावर पहा. ]