पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ( ४६ ) द्वारकादासः -याला शहाजीनें एक खास घोडा बक्षीस दिला होता; हा जातीचा वैश्य होता.
 ( ४७ ) देवकाशीकर:- याला शहाजीकडून वर्षासन होतें.
 (४८) शेषव्यास काशीकर-यालाहि शह जौकडून वर्ष सन होतें. देव क शेषन्यास वगैरे काशीकर विद्वानांचा, व भोसल्यांचा संबंध केवळ शिवा- जीच्या वेळी नव्याने घडून आला असें नव्हे; तर शहाजीमहाराजापासूनच काशांकर विद्वानांचा बडेजाव भोसल्यांच्या दरबारी होत आला आहे. व स्वदेशीं, व परदेशीं हजारों विद्वानाना शहाजांकडून वर्षासनें पोहोचत असत. असे जयराम कवानें वर्णन केले आहे.
 ( ४९ ) बलिभद्र कविः -याला शहाजीनें इत्ती दान दिला होता. याच्या समस्येस उत्तर देतांना मीरजुम्ला याच्यावरील स्वारीचें विस्तृत वर्णन जय- रामानें केलेले आहे. आणि शहाजीने त्यास गुत्तीच्या किल्यांत कोंडून सडकून चोपला. मीरजुम्ला हा अत्यंत श्रीमंत असून पराकाष्ठेचा कवडी चुंचक होता; तो अखेरास लाचार होऊन शहाजीस शरण आला. दिल्ली- श्वराचा पुत्र जो अवरंगजेब, त्याचे पाठवळ होते, तरीसुद्धा शहाजीपुढे त्याला मान वाकवावी लागली; व या विजयामुळें, शहाजीची चोहोकडे कित झाली, अशा आशयाचे त्यानें ऋवित्व केले आहे. या स्वारीची हकीकत शहाजीच्या चरित्रात दिली असल्याने ह्या ठिकाणीं तिची द्विरुक्ती केली नाही.
 ( ५० ) सुग्वलाल:- मीरजुम्ला याच्यावरील स्वारीनंतर शहाजीनें विज यानगरकर रायलू याच्यावर स्वारी केली; व जंतकल येथील युद्धांत राय- लूची सर्व फौज धुळीस मिळविली; व विजयानगरच्या राजानें क्षत्रियत्वाची लाज सोडून समरभूमीतून पलायन केलें, ही वार्ता ऐकून, "शहाजीची कीर्ति सर्व राजांहून श्रेष्ठ झाली, सर्वतोमुखी झाली; गुणीजनांना तो कर्ण किंवा भोज यांचा अवतार मासला व त्यांनी त्याला शिसोदे कुलावतंस ' ही पदवी दिली;" असे कवीनें वर्णन केले आहे. ( शिवाजीला पुढे " क्षत्रिय कुलावतंस " ही पदवी विद्वानांनी दिली, तिच्या फार पूर्वी शहाजीला शिसोदे कुलावतंस ही पदवी कवींनी दिलेली होती, हे लक्षांत ठेवण्यासारखें