पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९५ )

 ( ३९ ) ठाकूर चतुरद:- यानें शहाजीच्या वर्णनपर यमकबद्ध सवायी करण्यास जयरामास सांगितलें. शहाजीनें हात फिरंग धरली कीं, फिरंग्याच्या ( पोर्तुगीज लोकांचा ) चेहऱ्याचा रंग उतरतो, असें जयरामानें वर्णन केले आहे.
 ( ४० ) लछोरामः- लछीराम म्हणजे लक्ष्मीराम; याच्या समस्येच्या पूर्तीत शहाजीच्या कांतांचें काव्यमय वर्णन कवीने केले आहे. तीत ऐति- हासिक भाग नाहीं.
 ( ४१ ) श्याम गुसाई:- याच्या समस्येच्या समाधानात शहाजीच्या शत्रूवर व त्यांच्या बायकांवर जयरामानें कांहीं काव्यकोव्या केल्या आहेत; ऐतिहासिक भाग नाहीं.
 ( ४२ ) ठाकूर शिवदासः - याच्या समस्येच्या पूर्तीत जयराम कवीनें शहाजीच्या शत्रूच्या बायकांवर कांहीं काव्यकोट्या केल्या आहेत; ऐतिहासिक भाग नाहीं.
 ( ४३ ) केहरी:- म्हणजे केसरी; याच्या समस्येच्या उत्तरांत शहाजीच्या किर्तीचे काव्यमय वर्णन जयरामानें केले आहे. ऐतिहासिक भाग नाहीं.
 (४४) नारायणभट्ट गुरूः - शहाजी जर आपल्या बाजूला मिळेल तर आपल्याला फार जोर येईल, असे शहाजहान म्हणाला, या बाबीवर कवित्व करण्यास नारायणभट्टाने जयरामास सांगितलें; त्याच्या उत्तरांत जयरामानें कोटी करून, उत्तरेस शहाजहान व दक्षिणेस शहाजी हे उभयतां देशाचें संरक्षण करीत आहेत, असे दिग्दर्शित केलें; "इत शहाजू है उत शहाजहां है " ही तत्कालीन सर्वत्र प्रचलित असलेली म्हण जयराम कवीनें या वेळी आपल्या काव्यांत गोंवून दिली आहे; यावरून इ० सन १६५० च्या सुमारास शहाजीचें केवढे प्रस्थ वाढले असावें, याची कल्पना करितां येते. त्याप्रमाणेच दुसऱ्या एका काव्यांत, “शहाजीनें एका युद्धांत आपल्या -तरवारीनें समोर चालून आलेल्या हत्तीची सोंड उतरल्याचे वर्णन केले आहे, त्यावरून शहाजीची हिंमत ताकद व मर्दानीबाणा, यांचे योग्य अनुमान बांधितां येतें.
 (४५) गयंद कवी:- नांव पूर्वपरिचित नाही.