पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८)

कर हे धारचे परमार होत* हा प्रघात जर अव्याहत शेकडो नव्हे, हजारों वर्षे चालू आहे, तर उदेपूरच्या राजघराण्यांतील कुटुंबाची एक शाखा इकडे आली नाहीं, हें कशावरून ? एकव्या चालुक्यांचे किंवा यादवांचे किती तरी वंश ठिकठिकाण पसरले १ भोंसले आपली उत्पत्ति उदेपूरच्या राजघराण्याशों जोडतात; निंबाळकरांनी व यादवांनी त्यांच्याशी शरीरसंबंध केले; "वंशसंकरा-


 *याच परमार ऊर्फ पवार घराण्याची एक शाखा पुढे पुन्हां उत्तरेंत गेलेली आहे; भोज राजानंतर परमार घराण्याला उतरतीकळा लागली; या परमार घराण्यांत शककर्ता विक्रम व भोज हे पराक्रमी व कीर्तीमान राज्यकर्ते निपजले; त्यानंतर हे घराणे मोडकळीस आल्यावर विक्रमादित्याच्या वंशापैकी वडील शाखेतील एक पुरुष राजपुतान्यांत गेला; आणि मेवाड प्रांतांतील कांहीं प्रदेश हस्तगत करून घेऊन, हल्ली उदेपूरच्या राज्यांत, उदेपूरपासून अजमासे शंभर मैलांवर नैऋत्य दिशेस असलेल्या बिजोली या नांवाच्या गांवों आपली राजधानी केली; अद्यापि या घराण्याच्या वंशजाकडे उदेपूरच्या महा- राण्याच्या दरबारांत प्रमुख मानकन्याचा दर्जा चालू असून त्याच्या ताब्यांत शहात्तर गांवें आहेत.

 या बिजोली घराण्यापैकी शंभूसिंग या नांवाचा एक पराक्रमी पुरुष नर्मदा ओलांडून प्रथम दक्षिणेत आला; आणि अहमदनगर जवळील सुखवाडी ऊर्फ सुपें येथें वास्तव्य करून राहिला. या संभूसिंगास दळवी या उपनांवाच्या एका मराठा सरदारानें ठार मारिलें; शंभूसिंगास कृष्णाजी या नांवाचा एक अज्ञान मुलगा होता; तो वयांत आल्यावर, त्यास त्याच्या आईनें शिवाजी महाराजास भेटविलें, व त्यावेळेपासून त्याच्या उत्कर्षास सुरवात झाली. त्याच्या मृत्यू- नंतर त्याचा मुलगा बुबाजी यानें राजाराम महाराजास मोंगला- बरैरोबरील युद्धांत साहाय्य केल्यामुळे, त्यास राजारामानें “ सेनासप्तसहस्र " असा बहुमानाचा किताब दिला. कृष्णाजीनंतर काळूजीचा जेष्ठ मुलगा दुसरा कृष्णाजी, हा जहागिरीचा मालक झाला. पुढे धाकटा तुकोजीराव व त्याचा पुतण्या उदाजीराव हे माळव्यावरील स्वारीत पहिल्या बाजीरावाबरोबर होते; त्यांनी मोंगलाविरुद्ध घार जवळील तिरळा या गांवीं झालेल्या युद्धांत मोठा