पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७)

होत गेला. एकलिंग कुलस्वामी व चितोडदेवी ह्रीं या वंशाची राजपुता- न्यांतील आराध्य दैवतें होतीं. वंशवृद्धि होत गेली, तसतसी त्यांनी निर- निराळ्या ठिकाणी वतनें संपादिली. " वेरूळ, मनरथ, निरगुडी, शिडगांव, कळस, वावी, मुंगीपैठण, नानजव, जिती, खानवट, बनशेंद्रे, दुधवाडी वगैरे ठिकाणीX भोसल्यांच्या वंशजांनीं वस्ती करून वतनें संपादन केलीं; व त्या त्या ठिकाणी आज तागायत त्यांचे वंशज अस्तित्वांत आहेत.

 भोसल्यांचे घराणें दक्षिणेतील मराठे मंडळींत अतीशय प्राचीन व प्रसिद्ध आहे; आणि त्या घराण्याच्या उत्पत्तीविषयों निरनिराळ्या ठिकाणी भिन्न- मिन व पुष्कळ विवेचन केल्याचे आढळून येत आहे; तथापि छत्रपति शिवाजी महाराजांच्या आज्याचा आजा संभाजी याच्या वेळेपर्यंतची निश्चया- त्मक अशी माहिती अद्यापि उपलब्ध झालेली नाहीं;- म्हणजे संभाजीच्या काळापासूनची व त्याच्या पासूनच्या पुढील वंशाची विश्वसनीय माहिती उपलब्ध झालेली आहे; व त्या आधाराने भोसले घराण्याची पुढील हकीकत या ठिकाणी देण्यांत आली आहे. शिवाय “ भोसल्यांचा वंश उदेपूरच्या राजघराण्यापैकी नव्हे, " असे प्रतिपादन करण्यांत येतें; परंतु त्यास साधार कारणे मात्र कोणीही देत नाही. मौर्य, भोज, चालुक्य, यादव इत्यादि अनेक वंश उत्तरेंतून दक्षिणेत आले. तशींच दक्षिणेतील हीं अनेक घराणी कारणपरत्वें उत्तरेंत कायमची जाऊन राहिलीं, असेंही आपण पाहतों. फलटणचे निंबाळ-


 x हिंगणी, बेरडी व देऊळगांव ह्रीं गांवें पुणे जिल्ह्यांत बारामती तालु- क्यांत, व खानवट व कळस हाँ इंदापूर तालुक्यांत आहेत. जिंती, भीमा- तौरी सोलापूर जिल्ह्यांत, निरगुडी व शंभू महादेव दक्षिण महाराष्ट्रांत, वेरूळ व वेरूळच्या उत्तरेस बनशेंद्रे, हीं मोंगलाईत व पैठणजवळील मुंगीपैठण, नानजव व भांबोरी ही गांवें नगर जिल्ह्यांत आहेत, पैकीं मुंगीपैठण हैं गोदातीरी आहे. शिवाय याच जिल्ह्यांत दुधवाडी, भीमातीरी भिलवडी, व नाशिक जिल्ह्यांत सिन्नर तालुक्यांत वावी, हीं ठिकाणें आहेत; व या सर्व ठिकाणी भोसल्यांची निरनिराळी घराणी आजतागायत अस्तित्वांत असून, आपल्या वतनाचा उपभोग घेत आहेत.