पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६० )

लेला पाहून शहाजीनेही त्याच्या नाकाडावर ठोसा चढवून दिला, आणि कर्नाटकांतील त्याच्या इष्टेटीचा ताबा घेतला. नाटक असेच कांही वर्षे रंगत रहावें व त्यांत आपल्याला मनाजोगतों सोंगें घेतां यावी, अशी शहाजी व शिवाजी यांची इच्छा होती. परंतु दाराशुकोहची माशी शिंकून लढाई एक- दम बंद झाली, व तह झाला. त्यामुळे शहाजी व शिवाजी यांना आपल्या बेतांना निराळे स्वरूप द्यावे लागले. तहानें बेदर, कल्याणी, परांडा, निजाम- शाही कोंकण व वांगीमहाल इतक्या प्रांताला अदिलशाही मुकली. पैकी निजामशाही कोकण शिवाजी दाबून बसलाच होता; आणि विजापूर प्रांता- पासून म्हैसूरच्या उत्तरेकडील तुंगभद्रेपर्यंतचा प्रांत तेवढा अदिलशहाच्या ताब्यांत मोगलांचा मांडलीक म्हणून राहिला; व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील प्रांत शहाजीनें कायमचा बळकाविला होताच. महम्मदशहा मेल्यानंतर फक्त एका वर्षांत त्याच्या दिखाऊ ऐश्वर्याचें भांडवल फुटून, अदिलशाद्दी दौर्बल्य अगदर्दी उघडकीस आलें.” ( राजवाडे ). शहाजी विजापूर दरबारचे हुकूम न मानतां स्वतंत्रपणे कर्नाटकमधील कारभार करूं लागला; महाराज शहाजीराजे " या मायन्यानें, “ अमूक जहागीर ताबडतोब द्यावी; नाहीतर आपण पादशाही खिदमत सोडून देऊं अशी धमकी दिली. अशी घमकी देतांना, दोनचार पातशाहीत आपण नौकरी केली, पण कोठेही आपली इज्जत कमी करून घेतली नाहीं; " असे त्याला स्पष्ट लिहिले; आणि या " इज्जतीच्या " शद्धाला दुजोरा ह्मणून आपण रजपूत लोक" आहो, लोक " आहो, हें उच्चवंशदर्शक वाक्य शहाजीने अल्ली आदिलशहाच्या नजरेस आणिले; आणि आपल्या अंगीकृत कायत खंड न पडूं देतां, आपल्या वर्चस्ववृद्धांचें कार्य सारखे चालू ठेविलें. *


 *शके १५७८ मध्ये महंमद आदिलशाह मृत्यू पावल्यावर शहाजीनें त्याचा मुलगा अल्ली आदिलशाहा यांस खालील ( इतिहासमंजरी पहा.) धमकीचे पत्र पाठविलें तें
खान अलीशान फैरोजी निशान
 अजम अकरम ममलकत मदार दवामयक बाद्दल व इजललाहु ॥ 5 ॥ अमारत व अलायत पुन्हान शुजा अत व शमामत दस्तगाह अजमत व