पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५९ )

अभिवचन दिलें, व औरंगझेबाचाही पक्ष उचलला. खबरदारी मात्र अशां ठेविली की, एकाची बातमी दुसन्यास न मिळे. तिसरे बुड्ढेमिया शहाजी. ह्या वृद्ध कपनी आपण कशांतच नाही, ह्मणून कानावर हात ठेविले. आपले बेंग ळूर बरें की आपण बरें. शहाजी ह्मणजे आज साठ सत्तर हजार प्याद्यांचा व घोड्यांचा मालक. तो जर अल्लौशहास मिळता तर औरंगजेबा- सारख्या टारग्याची बिचाया अल्लीशहाला बुडविण्याची काय माय व्याली होती ? पण ह्या वेळीं कर्नाटक सुरक्षित ठेविले पाहिजे, व तेथून आपणांला इलतां येत नाहीं, असा बहाणा ह्या म्हातान्याने केला. आणि तेही खरेंच. औरंगजेबानें कर्नाटकांतील संस्थानिकांना चिथवून त्यांच्याकडून बंडाळी खरीच माजविली होती. चौथी भुतें अल्लांशहाचे अमीर उमराव, त्यांची तर सर्वांवर कडी. खाल्ल्या घरचे वांसे जाळणारे हे शहाणे आपल्या धन्याशी हरामपणा करून बाहेरच्या चोराला जाऊन मिळाले. अशी सारी वेताळसभा भावडया अल्लीशहाच्या भोवती कोलितें घेऊन नाचू लागली असतां औरंगजेबानें बेदर शक १५७९ च्या आषाढ शुद्ध तृतीयेस एका खटक्यासरसे हटिलें. नंतर कल्याणीही झपाटली. औरंगजेबाने ही बडी शिकार मारली, तर शिवाजीनें त्याच्याही वर ताण केली. औरंगजेबाला दिलेल्या वचनाला जागून, औरंगजेबानें बेदर घेण्याच्या अगोदर एक महिना, म्हणजे १५७९च्या वैशाखांत अदिलशहाचें जुन्नर लुट्न शिवाजी पहिला पंत झाला; आणि एव ढ्याने औरंगजेब कदाचित् खूष होणार नाही म्हणून त्याच वर्षाच्या अश्विन चद्य द्वादशीस कल्याण भिवंडी हबकून अदिलशहाचा कोंकणांतील राज्यभार त्यानें हलका केला. औरंगजेबाला दिलेले अभिवचन अक्षरशः पाळीत असतां अल्लीशहाशी केलेला करार शिवाजी विसरला नाहीं. अल्ली अदिलशहाच्या मर्जी- खातर शिवाजीनें औरंगजेबाच्या अहमदनगर प्रांतांतील गांव व खेडी लुटून खुद्द अहंमदनगरास नसीरीखानाशी दोन हात करून ते शहर लुटलें. येणे- प्रमाणे दोन्ही पक्षांना रिझविण्याच्या कामगिरींत शिवाजी गुंतला असतांना शहाजीने त्या नाटकाला रंग आणिला. जदुनाथ सरकारदेखील म्हणतात, Shahaji Bhonsla disobeyed his new master and set up for himself. अल्ली अदिलशहा औरंगजेबानें व शिवाजीनें असा नागवि