पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५७ )


वडिलाप्रमाणेच कर्तृत्ववान् असून त्यानेंही तंजावरच्या राज्याची उत्तम व्यवस्था ठेविली होती. या रघुनाथपंताची हकीकत पुढे शिवाजीच्या चरित्रात येणार असल्याने त्यासंबंधी या ठिकाणी अधीक उल्लेख केला नाही,


एक असून त्याच्यावर शहाजीचा अतीशय विश्वास व लोभ होता; व शहा- जीनें त्यास आपल्या पुण्याच्या जहागिरौंतील बाणेरें हा गांव वंशपरंपरें इनाम करून दिला होता. त्या संबधीचे शहाजीचे पत्र उपलब्ध आहे; (इति- हास संग्रह ) त्यांत असा मजकूर आहे कीं, अजरखतखाने महाराज राजश्री शहाजी राजे दाइमदौलत हूं बजानेब हूं कारकुनानी दाल, व इस्तक- बल, व देशमुखांनी प्रांत पुणे विदानद सु॥खम सैन अलफ दरवजे बाबत इनाम रा. नारायण ( नारो ) त्रिमल दिक्षित यांस इनाम मौजे बाणेरें, ता. हवेली, प्रांत पुणे, देहे एक देखोल नख्तयाती व महसूल व बाजे उजबती देखील तालुका ठाणे, व तालुका देहाय, व ठाणे बाब, व सैल बैल, व मोईन व सादीलवार, व खर्चपट्टी व पायपोसी व दसरापट्टी, व ठाणें भेट, व हुजूर भेट, व मोहीमपट्टी, व हेलकटी, व तमाखू व बागाईत व अद्दी- स्थान व विराहीस्थान व मोहतर्फा व थळजकाती, निकाळू व पैसाळू व अश्वजकाती व ठाणबंदी, व गाडा व घोडा व बंदी व बरदा व मेढीस्थळ व वेसीपेढी व पालभारा व बेगारी व राबता व आडपाली व कानू व गैरकानू व कमाविस हाल व पेस्तर, वेठे बेगार, फरमासी व सरद रसत व बार नगजग, अंबराई कुलबाब कुलकानू बाब महसुलेखी मौजे मजकूर देह १ एक अजरामदामत करून इनाम दिधला असे. दुमाले करणे अवलाद अफलाद चालविणे. यास मुसलमान होऊन जो कोणी इस्कॉल करील, त्यास मकेमध्यें सूर मारल्याची सोगंध असे. व हिंदु होऊच जो कोणी इस्कॉल करील त्यास कासीमध्ये गाय मारल्याचे पाप असे. हर दरसाल ताजे खुर्द खताचा उजूर न करणे. तालीक लिहोन तालीक लिहोन घेऊन अस्सल दिक्षित मजकुरापास परतोन देणें. छ १० जिल्हेज. " पुढील काळांत, ( छत्नपति शाहूच्या कारकीर्दीत ) त्रिमल रघुनाथाचे चिरंजीव गंगाधर त्रिमल व रघु- नाथ त्रिमल यांनी सातारा मुक्कामी येऊन, राजशक ६२ म्हणजे इ० सन