पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४७)

सिडबा खेडेबारी यांत व घुण आहेत त्यांजवल तुम्ही जमावानसी राहावें तुमची जबरदस्ती त्यां प्रांत आहे. अवघे मावळचे देशमूखदेखील त्यासी रुजू होऊन त्यांचे आशॅत वर्तेत यैसा विचार करून जबरदस्तीनें राहावें. येखादी मोंगलाईकडील फौज व ईदिलशाहीकडील फौज आली तरी आपण इमान राखावें. त्यांसो लढाई करावी, यैसी शपथ इमान पुरस्कर बेलरोटीवर हात ठेवून घेतली. " ( भा. इ. सं. मंडळ चतुर्थ संमेलनवृत्त पृ. १७९-१८०) शिवाजी आपल्या मनोदयाप्रमाणे वागत आहे, असे वाटत असल्याखेरीज शहाजीच्या हांतून असे वर्तन कसें घडेल १"

 इ० सन १६४० पासून जिजाऊ व शिवाजी यांवर शहाजीची इतराजी होऊन त्यांचे तोंडसुद्धां पहावयाचें नाहीं, असा त्यानें खरोखरच निश्चय


पातशाहासी तह केला की बारा गांवांतून मुजरा करून हुकुमाप्रमाणे कर्नाटक प्रति मसलत करावी. त्यावरून बेंगरूळ प्रांत पांचालक्षा होनाचा जाहागीर दिल्हा आहे. याकरितां आपणांस कर्नाटकची मसलत करावी लागली. तुमचें चतन मावळांत आहे. चिरंजीव राजश्री सिउबा ( शिवाजी ) खेडे बारिया व पुणा आहेत. त्या जवळ तुम्ही जमावानसी राहावे तुमची जबरदस्ती त्या प्रांतें आहे. अवघे मावळचे देशमूखदेखील त्यासी रुजू होऊन त्याचे आज्ञेत चर्तेत यैसा विचार करून जबरदस्तीने रहावें. येखादी मोंगलांकडील फौज व यदलशाहीकडील फौज आली, तरी आपण इमान राखावा. त्यासी लढाई करावी. " यैसी शपथ इमान पुरस्कर बेलरोटीवर हात ठेवून घेतली. तैसीच त्यांणीदि कान्होजी नाइकास शपथ दिल्ही, आणि कान्होजी नाईक यांस वर्षे देऊन बराबर हुजन्या व पत्रे देऊन राजश्री शिवाजीराजे यांजकडे पाठविलें, "

 कान्होजी जेधे व दादोकृष्ण या उभयतांनी पुढील काळांत, अफझल- खानाबरोबरील युद्धप्रसंगी शिवाजीची मोठीच महत्वाची कामगिरी बजावली; कान्होजी नाईक जेध्याचे वंशज भोर संस्थानांत, रोहिड खोप्यांतील कारी या गांव असून त्यांना कारीकर इनामदार जेधे देशमूख म्हणतात; व दादो- कृष्णाचे वंशज हल्लीं भोर येथें फडणिशी कामावर असतात.