पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४६)

वगैरे कारभाण्यांनी ही मुलुखागेरी केली हें स्पष्ट आहे. " येतांच " या बख रीतील पदावरून बेंगरुळास ठरले होते त्याप्रमाणे शिवाजीनें पुण्यास येतांच बारा मावळें काबीज केली, असा ध्वनी निवतो. बेंगरुळाहून येणें, व मावळें काबीज करणे, यांतला कार्यकारणभाव आम्हाला तर स्पष्ट दिसतो. चिटणीशी बखरीत तर ( शिवाजी महाराज ) शके १५६२ त या ( व राज्यस्थाप- नेच्या) मसलतीचा आरंभ करिते झाले." असें स्पष्टच म्हटले आहे. शके १५६२ त शिवाजीस बारावें वर्ष लागले होतें. शहाजीला कळविल्याखेरीज मसलतीचा प्रारंभ शिवाजीच्या कारभान्यांनी आपल्याच जबाबदारीवर केला, असे कसें घडेल १"

 शिवाजीच्या बंडाला मूळ कारण शहाजी आहे, याबद्दल खात्रीलायक पुरावा मिळाला असल्याखेरीज विजापूरचा सुलतान, शहाजीसारख्या असा- मान्य महत्वाच्या प्रघानपुरुषाची केवळ संशयावरून हुरमत घेऊन त्यास ठार मारण्यास तयार होईल, हें संभवत नाहीं. या अरिष्टांतून मुक्त होतांच खरें पाहिले तर, पुन्हां असा पुंडावा करून माझ्या जिवावर संकट आणूं नकोस, अशी शहाजीनें शिवाजीस ताकीद द्यावी; पण तसे न करितां उलट तो कान्होजी नाईक* जेध्यापासून आणभाक घेतो की, “चिरंजीव राजश्री


 *शहाजीस ( जेधे शकावली ) मुस्तफाखानाने बाजी घोरपड्यामार्फत चंदीजवळ पकडलें, ( शके १५७०, सर्वधारीनाम संवत्सर, श्रावण वद्य प्रतिपदा; इ० सन १६४८ ). त्या वेळी त्याच्याबरोबर कान्होजी नाईक जेधे, दादाजी ऊर्फ दादो कृष्ण लोहोकरे व त्याचा मुलगा रत्नाजीपंत हे मावळ प्रांतातील वतनदार शहाजीबरोबर होते; त्यांनाही पकडून कनकगि- रीच्या किल्लयांत अटकेत ठेवण्यांत आलें; त्या ठिकाणी रत्नाजीपंत मृत्यु पावला; पुढे ६० सन १६४९ मध्ये ( शके १५७१ विरोधी संवत्सर ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा ) शहाजी, कान्होजी जेधे, व दादोकृष्ण यांना कोंडाणा येथे आणून त्या ठिकाणी त्यांची प्रतिबंधांतून मुक्तता केली; शहाजी महारा- जांची व त्यांची भेट झाली ते समय महाराज बोलिले की, " तुम्ही आम्हामुळे बंदीवासी, श्रमी जालेस; ( झालांत ) याउपरि आम्ही