पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ११२ )

अखेर पूर्ण नाइलाज होईपर्यंत तो मोंगलाशीं झगडत राहिला, यावरूनच त्याची हिंमत, कर्तबगारी, घडाडी व करारी बाणा, ही निदर्शनास येतात.

 विजापूरकराबरोबरील तह झाल्यानंतर, मॉगल सरदार शाहिस्तेखान यानें चांदवड, नाशिक व संगमनेरकडील, त्रिपक, शिवनेरी व कोंडाणा वगैरे किल्लघांशिवाय, सुमारें पंचवीस किल्ले हस्तगत करून घेतले; इकडे खान जमान हा जूनच्या प्रारंभी अहंमदनगर येथून निघून शिवनेरीचा किल्ला हस्तगत करून घेण्याकरितां जुन्नर येथे आला; व नवीन तहाभन्वयें विजा- पूरकराकडून सेनापती रणदुल्लाखान याची सैन्यासह रवानगी झाली होती, तोही त्यास येऊन मिळाला. जुन्नर येथें आल्यावर तोफखान्याच्या मदती- शिवाय शिवनेरीचा किल्ला हस्तगत करून घेतां येणार नाही, अशी खान- जमान याची खात्री झाली. तेव्हां तो हस्तगत करून घेण्याच्या भानगडींत न पडतां, तेथें किल्लघास शह देण्याकरितां दोन हजार लोक ठेवून, तो, शहाजी पुण्यास येऊन राहिला होता, तिकडे त्याच्यावर जून महिन्याच्या अखेरीस चाल करून निघाला. परंतु वाटेंत पावसाने झोड उडविल्यामुळे त्यास घोड- नदीवर एक महिना मुक्काम करून रहावे लागले. या अवर्धीत विजापूरकर सरदार रणदुल्लाखान यानें शहाजीशीं समेटाची वाटाघाट सुरूं केली, व त्यास आपल्या ताब्यांतील किल्ले मोंगलांच्या हवाली करून विजापूर येथें आपणां- बरोबर येण्याविषयीं सुचविलें, परंतु ते शहाजीनें मान्य केले नाही. इतक्यांत पावसाळाही समाप्त झाला; तेव्हां खानजमान लोहगांवांपर्यंत पुढे चाल करून आला; है पाहातांच शहाजी पुणे सोडून कोंडाणा व तोरणा या किल्लयांच्या दरम्यान असलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या आश्रयास जाऊन राहिला; तेव्हां तिकडील पहाडी प्रदेशांत जाणे निरर्थक आहे, असे जाणून खानजमान बोर घाटानें खाली उतरला; व आपल्या सैन्याच्या लहान लहान टोळ्या करून, सर्व उत्तर कोंकणभर त्यानें धुमाकूळ माजविला. इकडे शहाजी हा कुंभारलीच्या घाटानें खाली उतरला; व चोहोकडे पांगलेल्या मोंगली टोळ्यावर सारखे छापे घालून त्यांना अतीशय हैराण केलें, व त्यांचा पुष्कळ नाश उडविला. तेव्हां खानजमान यानें हैं सर्व पांगलेले सैन्य पुन्हां एकत्र जमविलें; व तो शहाजीवर चाल करून आला. परंतु शहाजी पुन्हां तेथून निसटला; व घांट चढून वर निघून गेला. तेव्हा