Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्रीमंतांचे अभिनंदन

 श्रीमंत सरदार गंगाधरराव साहेब यांच्या संबंधी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे. श्रीमंतांचा व माझा लहान- पणा पासूनचा परिचय असल्याने श्रीमंतांना, या ग्रंथास आश्रय देण्याबद्दल मी विनंती केली; व ती त्यांनी मान्य करून, मराठ्यांच्या इतिहासाच्या ह्या पहिल्या, व याच्या पुढील सर्व भागास, आपला उदार आश्रय देऊन, मला आपलें ऋणी केलें आहे; इतकेंच नव्हें तर श्रीमंतांच्या कृपें- मुळेच हा सर्व ग्रंथ पूर्ण होणार असल्यामुळे, त्याचे श्रेय श्रीमंत गंगाधरराव साहेब यांनांच देणे इष्ट आहे.

दत्तात्रय.