Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३९ )

 दुसरे राज्य चोल, हॅ असून ते पांड्य राज्याच्या मानानें पुष्कळच मोठें होर्ते. इ. सनापूर्वी चवथ्या शतकांत रचिलेल्या कात्यायनाच्या व्याकरणावरील ग्रंथांत पांड्य व चोल या दोन्हींही राज्यांचा निर्देश केलेला आढळतो. हे राज्य पूर्व किनान्यावर नेऊर या शहरांपासून पदुकोाई शहरापर्यंत, व पश्चिमेस कूर्ग प्रांताचे सरहद्दीपर्यंत पसरलेले असून त्याची राजधानी उरयूर उर्फ त्रिचनापल्ली- हे शहर होतें; या राज्यांत परांतक या नावांचा एक पराक्रमी राजा होऊन गेला; त्यानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा राजादित्य हा राष्ट्रकूट घराण्यांतील तिसरा कृष्णराजा याच्या बरोबरील युद्धांत मारला गेल्यावर पांच साधारण योग्यतेचे राजे गादीवर आले; परंतु त्यांच्या मागून राजराज देव, राजेंद्र चोल- देव, व राजाधिराज देव हे तीन पराक्रमी व कर्तृत्ववान् राजे गादीवर येऊन त्यांनीं चोल राज्याची अतीशय भरभराट केली. यांपैकी राजराज देव याने बहु- तेक मद्रास प्रांत, सिलोन व म्हैसूरचा बराच भाग, वेंगीचें पूर्व चालुक्यांचें राज्य व मलबार किनाऱ्यांवरील क्विलोन, व कलिंगचें उत्तर राज्य, हीं आपल्या हस्तगत करून घेतली; इतकेच नाहीं तर आपणांजवळील प्रबळ आरमाराच्या जोरावर त्याने लखदीव बेटेंही आपल्या ताब्याखालीं आणिली; त्यानें तंजावर येथें एक भव्य शिवमंदीर बांधिले; या मंदिराच्या भिंतींवर त्याच्या विजयाच्या इतिहासाचीं चित्रे खोदिलेलीं आहेत; हें मंदीर हल्लींही अस्तित्वांत असून उत्तम स्थितींत आहे; रामराजा हा स्वतः हिंदुधर्मी असून शिवभक्त होता; तथापि बौद्ध धर्मावर त्याचा कोणत्याही प्रकारें कटाक्ष नसून उलट नागापट्टम येथील बुद्धाच्या मंदिरास त्याने मोठ्या उदारपणानें अनेक वेळा देणग्या दिल्या होत्या; रामराजा हा इ. सन १०१८ मध्ये मृत्यु पावला व त्याचा शूर व महत्त्वाकांक्षी मुलगा राजेंद्र चोलदेव हा गादीवर आला. त्याने आपल्या कारकीर्दीत ओरिसा व बंगाल प्रांतापर्यंतचा प्रदेश ताब्यांत आणिला व ब्रह्मदेशांतील कादारम बंदरां- वरही आपले आरमार पाठविलें; शिवाय लोकोपयोगाकरितां त्यानें सोळा मैल लांबीचा बंधारा बांधून एक प्रचंड तलाव खोदविला व ' गंगैकोंड चोलपूरम् ' या नांवाचे शहर वसवून तेथे आपली राजधानी स्थापन केली; रजेिंद्र चोलदेव हा इ. स. १०३५ मध्ये मृत्यु पावला, व त्याचा मुलगा राजाधिराजदेव हा गादीवर आला; त्यानें सतरा वर्षे मोठ्या कर्तृत्वानें राज्यकारभार केला, परंतु इ. सन १०५२ मध्ये म्हैसुर प्रांतांत ' कौप्पम् ' येथे चालुक्य वराण्याशीं