Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३९ )


च्या वर्षी मृत्युमुखी पडला, " पाश्चात्य लेखकांनी अकबराची जितकी स्तुती केली आहे, तितकी दुसऱ्या कोणत्याही पार्वात्य राजाची केलेली नाहीं; आणि अकचर या स्तुतीस पात्रही होता. अकचराने राजकार्यात जी योग्यता दाखविली आहे, त्याचे विस्तृत वर्णन करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाहीं; पण जातां जातां एवढे सांगितले पाहिजे की, त्याची वसूली पद्धत, जमीन मोजण्याची रीती, लोक संरक्षणाची त्याची योजना, लोक मताला तो देव असलेला मान, व त्याची धार्मिक सहिष्णुता या गुणांमुळे त्याचे समकालीन त्याजवर प्रेम करीत, व त्याच्या मागचे लोक त्याची स्तुतीस्तोत्रे गात आहेत. त्याच्या अर्थशास्त्र पारंगते बद्दल “ आयने अकबरी " हा ग्रंथ मूर्तिमंत उदाहरण आहे. जहांगीरचा मेहुणा अशफरखान (आसफखान ) यानें इंग्रज वकील टेरी याला, एक मेजवानी दिली; ति विस्तृत वर्णन त्याने केले आहे. ते पाहिले म्हणजे, उच्च दर्जातील मुसल मानाची शिष्टाचार पद्धति किती उच्च कोर्टातील होती, याची कल्पना येते. मोगल साम्राट व्यापार वृद्धिकडे विशेष लक्ष देत असत व त्यामुळेच एकट्या ( इंग्रज) ईस्ट इंडिया कंपनीलाच नव्हे, तर दुसऱ्याही कित्येक युरोपियन व्यापाऱ्यांना व्यापाराची परवानगी देण्यांत आली होती. मालावर विशेष जकात नसे; तथापि चांदीच्या माला बद्दल विशेष निर्बंध होते. मोंगलानां चिनी मातीच्या भांड्यांचा फार शोक असे, व अस सांगतात की, अकबर मेला त्यावेळी फक भाग्रा येथील -राजवाड्यांतच पंचवीस लक्ष रुपयांहून अधिक किंमतीची नक्षी केलेली भांडी पूर्वेकडील चीन व पश्चिमेकडील व्हेनीस येधून आलेली होती. देशात शांतता ब सुबत्ता नांदत असल्या शिवाय, अशा प्रकारचा व्यापार अर्थातच चालत नाहीं. मिस्तर व्हिन्मेंट स्मिथ हा आपल्या "अकबर" या पुस्तकात लिहितों कीं, अकबराच्या वेळी वाहतुकीचे रस्ते फारच सुरक्षित असले पाहिजेत. कारण टेरी या वकिलाने सुरत येथून मध्य हिंदुस्थानापर्यंत चारशे मैलाचा प्रवास अवघ्या ४ युरोपियन व २० एतद्देशीय अनुचरा समावेत अगदी मुखरूप केला. अक बराय लिहिणं वाचतां येवो अगर न येवो, परंतु त्याने जे जे पाहिले, व ऐकलें, तें तें सर्व त्याने आपलेसे करून ट। किले, यात शंका नाहीं. त्याच्या दरबारात भोज· किंवा विक्रमादित्य यांच्या प्रमाणे उत्कृष्ट विद्वत् चमकत होतो. त्याला विद्यामिकी इतकी होती की, त्यानें उत्कृष्ट ग्रंथ सुंदर अक्षरांत लिहवून, त्यांत