Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 " मराठ्यांचा इतिहास लिहितांना शिवाजीच्या पूर्वीच्या काळातील मराठयांच्या राजकीय परिस्थितीची थोडक्यात माहिती देऊन, छत्रपति शिवाजी.. महाराजाच्या काळापासून त्यास प्रारंभ करणे पुष्कळ दृष्टीनें अपूर्ण आहे; आणि प्राचीन कालातील हिंदुस्थानांतील अनेक निरनिराळी राजकीय स्थित्यंतरें कस- कशी घडून आली व त्यातच मराठ्यांनीही शिवाजीच्या काळापर्यंत आपले राजकीय महत्व कसे वाढवीत नेले, वगैरे पूर्व माहितीसह त्याचें विवेचन केलें तरच तो क्रमवार व सुसंगत होऊन त्यांत अपूर्तता राहणार नाहीं, असें प्रस्तुतच्या लेखकाचे मत असल्याने पूर्वकालीन माहिती थोडक्यांत या भागांत दिल्ली आहे; व त्यावरून आपले पूर्वज किती कर्तृत्ववान होऊन गेले, आणि त्यांनी जगाच्या संस्कृतींत किती महत्वाची भर घातली, याचे ज्ञान होऊन त्यांच्याविषय आपल्या मनांत अत्यंत पूज्यभाव व अभिमान उत्पन्न होईल, अशी आशा आहे.
 त्याप्रमाणेच या भागांत, हिंदूधर्म, व त्याचें श्रेष्टत्व, त्या धर्मातील उदात्त तत्वें मुसलमानांची कर्तबगारी, हिंदू संस्कृतीचा त्यांच्यावर झालेला परिणाम, हिंदूलोकांमधील निरनिराळे धार्मिक मतभेद, पंथभेद, हिंदुस्थान देशाची सुसंपन्नता, संस्कृति, व श्रेय हिंदूलोकांचे शील, व स्वभाव, विजया- नगरच्या राज्यापर्यंतचीं अनेक हिंदुराज्यें, त्यांचा उत्कर्ष व अपकर्ष, मुसल- मानांच्या स्वाया व त्यांच्या वर्चस्व स्थापनेस प्रारंभ, वगैरे बाबतींची थोडक्यात माहिती दिलेली आहे; व त्यावरून तत्कालीन राजकीय परिस्थितीसंबंधी योग्य माहिती मिळणारी आहे. थोडक्यांत म्हणजे प्रोफेसर मॅक्समुल्लर याने बन्सेनच्या चरित्राच्या प्रस्तावनेत म्हटल्या प्रमाणे- "मृत्यू पावलेल्या थोर इष्टमित्रांच्या गुणांचे वर्णन करावें, त्यांच्या नांवास बहुमान द्यावा, आणि त्यांच्याकरितां । शोक करावा, हेच आपले मुख्य कर्तव्य आहे असें कोणी समजूं नये; तर त्यांच्या इच्छा काय होत्या, आणि कोणत्या चांगल्या गोष्टी करण्याविषयीं त्यांचा दाग्रह होता, हे पूर्णपणे समजून घेऊन त्याप्रमाणे चालणे, व व त्या गोष्टी करण्याविषर्थी झटणे, हेंच आपले पवित्र व उत्तम कर्तव्यकर्म आहे. " अर्थात अशा दृष्टीने या प्राचीन इतिहासाचे मनन केल्यास त्यापासून पुष्कळच उपयोग . होईल, व ज्ञानातही अधीक भर पडेल, अशी खात्री आहे.

मुंबई. गिरगांव,
ता. १५ जून इ. सन १९२१

द. बा. करकरे.