पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे     प्रकरण तिसरें.     ७७

आकाशाच्या दक्षिणगोलार्धात " नौका ” म्हणून एके तारकापुंज आहे. त्यामध्ये अगस्य म्हणून एक तारका आहे. ही तारका पहिल्या प्रतीची आहे. आर्यलोकांनीं विंध्यपर्वत ओलांडला, तेव्हां अति भव्य व अति तेजस्वी असे नवे तारकापुंज त्यांच्या दृष्टीस पडले. प्रथमच दक्षिणेकडे जे आर्य आले त्यांस अफाट अंतरिक्षांतील भव्य व मनोहर देखावा पहिल्यानेच जेव्हां दृष्टिगोचर झाला, तेव्हां त्यांच्या चित्तवृत्तीस किती आनंद झाला असेल? त्यांच्या ह्या आनंदाचे द्योतक " अगस्त्य " या नांवामध्ये आपणांस सांपडते; अत्यंत दक्षिणेकडची, अत्यंत तेजस्वी, क्षणाक्षणांत तांबडा, पिवळा, निळा, अस्मानी, हिरवा, असे वेगळे वेगळे रंग दाखविणारी व अंतरीक्षांतील असंख्य तारकांवर जणों साम्राज्य भोगणारी ही मनोहर तारका जर इहलोकींच्या मनुष्याच्या नांवाने निर्दिष्ट करावयाची होती तर तिला कोणच्या भाग्यशाली पुरुषाचे नांव देणे साहजिक होते ! ज्या साहसी पुरुषाने आर्यलोकांस ह्या नव्या व सुपीक देशाची ओळख करून दिली, त्याचेच नांव तिला देणे साहजिक होते. तर ह्या " अगस्त्य" नांवावरून असे उघड आहे की "अगस्त्य " या नांवाच्या आर्यपुरुषाने प्रथम विंध्यपर्वताच्या दक्षिणेकडे आगमन केलें. हे अनुमान खरे आहे असे दुसऱ्या अनेक प्रमाणांवरून ठरलेलें आहे.

 आर्यलोक हे उत्तरेकडून दक्षिणेकडे आले, दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले नाहीत, हे ठरविण्याचे दुसरें एक साधन आहे. हिमालय आणि विंध्य ह्यांच्या मधील प्रदेशांत वर्षाच्या साऱ्या ऋतूंमध्ये हिंवाळा हा मुख्य लक्षांत धरण्यासारखा आहे. म्हणून वर्षाची गणना ह्या ऋतूवरून होऊ लागली