पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे     प्रकरण तिसरें.     ७५

भाग, व इंद्रियें, व त्या इंद्रियांचे व्यापार ह्यांचे वाचक शब्द ; आप् ( मिळविणे ) कसणे, चालणे, तापणे, दह् ( जाळणे ), धमणे ( फुकणे ), जाणणे, नमणे, नमस् ( नमस्कार ), पचणे ( शिजविणे ), पडणे, पुसणे ( विचारणे ), पाठविणे, हन् ( मारणें ), बांधणे, मर्दणे, मरणे, रुजणे, वर्षणे, शकणे, शोधणे, स्वन् ( शब्द करणे ), स्वप् ( निजणें ), स्तविणे वगैरे सामान्य क्रिया दाखविणारे शब्द ; दार, धान्य वगैरे सुधारणेच्या पंथास लागलेल्या समाजाचे शब्द ; दारु ( लाकूड ), भूमि वगैरे सर्वत्र आढळणारे पदार्थांचे वाचक शब्द ; आभाळ, उष्णता, तेज, मेघ, वात ( वारा ), क्षपा ( रात्र ), वगैरे सष्टींतील चमत्कार व पंचमहाभूते ह्यांचे वाचक शब्द ; अयस् ( लोखंड ), हिरण्य ( सोने ), वगैरे महत्वाचे धातू ह्यांचे वाचक शब्द ; आराम, शेत, लांब, दूर, नेदिष्ट ( जवळ ), पूर्ण, भिषज्, मर्त्य, महा, यव, जादू, रास्त, श्याम, श्वेत, संगम, सर्व, स्व, क्षीर इत्यादि इतर किरकोळ शब्द ; हे ह्या दोन्ही भाषांत समान आहेत. शब्दांच्या अभ्यासापासून हें जें गत गोष्टीचे ज्ञान आपणांस प्राप्त होते ते किती मौल्यवान् आहे बरें ? येथवर आम्हीं जो विचार केला आहे, तो मुख्यत्वेकरून सापेक्षभाषापरिज्ञानाचा विषय व गौणत्वाने किंवा उपांगत्वाने भाषापरिज्ञानाचा विषय आहे; ह्या उपांगाचा विचार विस्तारें करून केलेला कोठेही आढळत नाही. ह्यासंबंधाने आमच्या वाचकांनी अगदीच अपरिचित राहू नये म्हणून आम्ही इतका विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. आतां आम्हीं मुख्य विषयाकडे वळतो.

 आर्य लोक उत्तर हिंदुस्तानांत शेकडों वर्षे राहून नंतर दक्षिणेत आले. ह्याचा पुरावा आर्यावर्तदक्षिण ह्या शब्दांत