( १३ ) लक्षणासंबंधीं अज्ञान प्रदर्शित करणें होय. वर दिलेल्या नामावलींतून फक्त सहा कवींनी मात्र संस्कृतांतील पौराणिक व ऐतिहासिक वाङमयांतून स्फूर्ति मिळविण्याचा उद्योग केलेला दिसतो. एकप्रकारें इतर कवींचा जुन्या प्रवृत्तीविरुद्ध एकसारखा निषेध चालू होता. पुष्कळ कवि व संत संस्कृतज्ञ नव्हते व जुन्या ध्येयांबद्दल आपला अनादर व्यक्त करण्यांत त्यांनीं बिलकूल भीड धरली नाही. त्यांची कविता पंडितांसाठीं नसून सामान्य जनसमूहासाठीं होती; व नांवाजलेल्या ब्राह्मणपंडित कवींपेक्षां त्यांच्यांतील पुष्कळजणांत खरें कवित्वही आधक दिसून येतें. नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास, महिपती, मुकुंदराज, मिराबाई, जनाबाई, रामजोशी, निळोबा, प्रभाकर, रंगनाथस्वामी, वगैरे कवींचे ग्रंथ नुसते चाळले तरी वरील ह्मणण्याची सत्यता पटेल. त्यांस खास अर्वाचीन कवीच ह्मटलें पाहिजे. अर्वाचीन हिंदुस्थानाच्या उषःकालापासून तों मराठी राज्याच्या उदयकालापर्यंतच्या प्रगतीच्या तीन शतकांत जें नवीन मत जोरानें प्रचलित होत चाललें होतें ला मताचे निदर्शक ते कवि होते. पोवाडे व लावण्या करणारांच्या काव्यास संस्कृताचा खात्रीनें गंधही नव्हता इंग्रजांनी दक्षिणहिंदुस्थान काबीज केल्यापासून, या जुन्या कवींच्या पंक्तीस बसवितां येईल, असा एकही नामांकित कवि मराठी वाङमयाच्या या शाखेत निपजला नाही. कांहीही असो आमचा स्वातंत्र्यसूर्य मावळल्याबरोबर ॲान्मच्यांतील कवित्वज्योतही विझाली. मधून मधून जो एकाददुसरा दिवा कचित् झळकतो त्याचें तेज स्वयंभू नसून बहुतेक उसनेंच दिसते. अमच्या पंडिताच्या पहिल्या पिढीत एक कृष्णशास्त्री चिपळूणकर नांव घेण्यासारखे झाले खरे, परंतु त्यांनाही स्वतंत्र काव्यरचनेचा फारसा प्रयत्न केलेला आढळत नाही ते व परशुरामपंत गोडबोले हे उत्तम भाषांतरकार होऊन गेले. संस्कृत कवितेस प्रचलित मराठीचा वेष देऊन तिला नष्टविण्याची हातोटी त्यांस उत्तम साधली होती. कृष्णशास्त्री राजवाडे व गणेशशास्त्री लेले हे त्याच वर्गातील होत. तरी रघुवंशाच्या भाषांतरावरून लेल्यांची आधक श्रेष्ठता दिसून येते. सांप्रत कवीं च्या ग्रंथातही उत्तम कवितेचे मासले आढळतात. डॅ. के. आर. कीर्तिकर यांचे 'प्रिन्सेस'चें रूपांतर-इंदिरा, रा. कुंटे यांचा 'राजा शिवाजी' ' Hन ? (Sketh of mind), T. rritë qiej e ख्रिस्तस्तोत्र ? (Christian hymn ) भास्कर दामोदर यांची ' रत्नमाला 'जुवेकरांची * कृष्णाकुमारी > वामन दाजी ओक यांचें 'काव्यमाधुर्य' बजावा प्रधानाचे 'दैवसेन (Daiva
पान:मराठी वाड्मयाची अभिवृद्धी.pdf/18
Appearance