पान:मराठी रंगभुमी.djvu/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१
भाग १ ला.


याचें हें एक अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. या नाटकांत भुताचें, ऑफिलियेचें व हॅम्लेटच्या आईचें हीं कामें हॅम्लेटच्या कामाच्या खालोखाल होतात. ऑफिलियेची भुमिका रा. बळवंतराव हे घेत असून ऑफिलियेचें हॅम्लेटवरील प्रेम व हॅम्लेटनें झिडकारून टाकल्यावर वेडानें झालेली तिची स्थिति, हीं कामें ते फारच उत्तम करितात.
 याप्रमाणें झुंझारराव, मानाजीराव, बाजीराव राणू भीमदेव, बाजी देशपांडे, कांचनगडची मोहना वगैरे जीं जीं नाटकें ही मंडळी करितात तीं तीं प्रेक्षणीय होतात. त्यांतून रा. गणपतराव व बळवंतराव यांच्या मुख्य मुख्य भूमिकांनीं तीं विशेष प्रेक्षणीय होतात हें निराळे सांगावयास नको. यांच्या मंडळींत हॅम्लेट नाटकांत हॅम्लेटच्या चुलत्याचें काम चांगलें होत नसे. हें काम रा. सुपकर हे करीत असून त्यांचा आवाज धन्यापेक्षां चाकराच्याच कामास योग्य असल्यामुळे यावेळीं त्यांची छाप पडत नसे. एवढेच नव्हे तर, उलट रसाचाही भंग होई. रा. गणपतराव यांना वीर, करुणा हे दोन रस जितके साधतात तितका हास्यरस साधत नाहीं; व याची प्रचीत त्राटिका आणि हॅम्लेट या दोन नाटकांत चांगली येते. रा. बळवंतराव यांस शृंगार व हास्य हे रस जसे साधतात तसा शेोकरस साधत नाही; व याची प्रचीत कोणत्याही प्रयोगांत प्रेक्षकांना पहावयास सांपडेल; आणि खुद्द प्रो. केळकर यांनीही वरील दोन पात्रांसंबंधानें असेच